Budget News In Marathi: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प 2024-25 संसदेत सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पातून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसामान्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान आवास योजना आणि मोफत वीज यांबाबत अर्थमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषण्या केल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत म्हटलं आहे की, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेला आहे. पारदर्शी शासन यावर आमच्या सरकारचे लक्ष्य आहे. निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत येत्या 5 वर्षात ग्रामीण भागात दोन कोटी घरे बांधणार असल्याचे जाहीर केले आहेत. तर, प्रत्येक महिन्याला 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटलं आहे की, सरकार आर्थिक नीतीचा अवलंब करुन लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर देणार आहे. ज्यात सर्वसमावेशक विकासावर भर देण्यात येईल. आर्थिक नीती लागू करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्यासोबतीने काम करेल. पीएम आवास योजनेअंतर्गत 3 कोटी घरं बांधण्यात आली आहेत. आता सरकार मध्यम वर्गातील लोकांसाठी घरांची योजना आणणार आहे. यामध्ये येत्या 5 वर्षांत तब्बल 2 कोटी घरं दिली जाणार आहेत.
केंद्र सरकार आणखी एक योजना घेऊन येत आहे. रुफ टॉप सोलर योजनेंतर्गंत ग्रामीण भागातील 1 कोटी घरात 300 युनिट फ्री वीज प्रत्येक महिना दिली जाणार आहे. मध्यम वर्गासाठी हाउसिंग प्लान लाँच करण्यात येणार आहे. यात 1 कोटी सोलर पॅनल हाउसहोल्डना मोफत विज दिली जाणार आहे. मोफत विज देण्याची केंद्र सरकारची ही योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.