India China Conflict : चीनच्या घुसखोरीबाबत राजनाथ सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले सीमाभागात...

India China Conflict : लोकसभेत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत- चीन झटापटीविरोधात काही महत्त्वाचे  महत्त्वाचे मुद्दे मांडले   

Updated: Dec 13, 2022, 12:37 PM IST
India China Conflict : चीनच्या घुसखोरीबाबत राजनाथ सिंह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले सीमाभागात...  title=
India China Conflict chinese armed force attempt infiltration in indian border live updates

India China Conflict :अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील झटापटीबाबत केंद्रीयसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत निवेदन केलं. सैन्यदल प्रमुख, सीडीएस यांच्यासह अजित डोवाल यांच्यासोबत झालेल्या अतिशय महतत्वाच्या बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन केलं. 

India China Conflict: युद्धाचं सावट! 300 चिनी सैनिकांची घुसखोरी? सीमाभागात भारतीय लष्कर सतर्क  

काय म्हणाले राजनाथ सिंह? 

संरक्षण मंत्री संसदेत निवेदन करण्यासाठी उभे राहताच विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. विरोधक काहीसे शांत होताच सिंह यांनी निवेदनास सुरुवात केली. 

'9 डिसेंबर 2022 ला PLA सैन्यानं यांगत्से मध्ये लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवर हल्ला करत एकतर्फी परिस्थिती करण्याचा प्रयत्न केला. पण, चीनच्या या कुरापती आपल्या लष्करानं दृढ निश्चयानं उधळून लावल्या. या झटापटीमध्ये PLA ला रोखत भारतीय सैन्यानं त्यांना (चीनच्या सैन्याला) त्यांच्या तळावर परतण्यास भाग पाडलं. यामध्ये दोन्ही सैन्यदलातील जवानांना दुखापती झाल्या. पण, भारतातील कोणत्याही सैनिकाला यामध्ये वीरगती प्राप्त झाली नसून, कोणही गंभीर दुखापतग्रस्त नाही.'

लष्करातील जवानांनी वेळीच या गोष्टीची दखल घेतल्यामुळं चीनचं सैन्य आपल्या तळावर परतण्यास भाग पडलं. सदर घटनेनंतर या परिस्थितीविषयी फ्लॅगमिटींगही झाल्याचं सिंह यांनी लोकसभेत सांगितलं. 

सदर बैठकीमध्ये चीनच्या सैन्याला अशा कारवाया न करण्याचा इशारा देत सीमाभागात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन भारतीय सैन्याकडून करण्यात आलं. आपलं सैन्य राष्ट्राच्या अखंडतेला सुरक्षित ठेवण्यासाठी तत्पर असल्याचं म्हणत सिंह यांनी निवेदनावेळी सभागृहाला आश्वस्त केलं.

हेसुद्धा वाचा : "नेहरुंच्या प्रेमामुळे भारताचा..."; तवांगमधील संघर्षांनंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

 

अमित शाहसुद्धा कडाडले... 

तिथे केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी भारतीय सैन्याच्या साहसाचं कौतुक केलेलं असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चीनला कडाडून इशाराच दिला. मोदी सरकार देशात असेपर्यंत देशाच्या एक इंच जमिनीवरही कोणी ताबा मिळवू शकत नाही असं ते म्हणाले आणि भारतीय जवानांनी दाखवलेल्या वीरतेचं कौतुक केलं.