Indian Army in jammu and kashmir: देशाच्या उत्तर सीमेकडे असणाऱ्या जम्मू- काश्मीरबद्दल आता केंद्र सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. Article 370 हटवल्यानंतर आता तब्बल तीन वर्षांनंतर केंद्राकडून एका महत्त्वाच्या मुद्द्यावर विचार केला जात आहे. येत्या काळात केंद्रशासित प्रदेशांतून सैन्य मागे घेण्याच्या तयारी केंद्र सरकार दिसत आहे. विशेष राज्याचा दर्जा हटवला गेल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था, सैन्य तैनात करअयात आलं होतं. आता मात्र (Kashmir Valley) काश्मीरच्या खोऱ्यातील बहुतांश भागातन हळुहळू सैन्य मागे घेण्याचा विचार देशातील सरकारनं केल्याचं कळत आहे.
जम्मू काश्मीरमधील सैन्यासंदर्भात हा निर्णय घेतला गेल्यास भारतील सैन्याची कारवाई फक्त नियंत्रण रेषेपर्यंतच सीमीत असेल ही बाब लक्षात घेण्याजोगी. एका प्रतिष्ठीत माध्यमसमूहाच्या वृत्तानुसार संरक्षण दलाच्या सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सैन्य हटवलं जाण्यासंबंधी चर्चा होत असल्याच्या वृत्तांना दुजोरा दिला. संरक्षण मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय, संरक्षण दल, जम्मू काश्मीर पोलीस यांचा सहभाग असल्यामुळं आता याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो. काश्मीरच्या खोऱ्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या धर्तीवर भारतीय सैन्याच्या सोबतीनं तैनाच असणाऱ्या CRPF च्या तुकड्याही सदरील भागातून हटवल्या जाऊ शकतात.
अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यदलातील तब्बल 1.3 लाख जवान तैनात आहेत. यापैकी 80 हजार जवान देशाच्या सीमाभागात तैनात आहेत. तर, काश्मीरच्या अंतर्गत भागात राष्ट्रीय रायफल्सचे जवळपास 40 ते 45 हजार जवान तैनात आहेत. ज्यांच्यामार्फत या भागात दहशतवादविरोधी मोहिम चालवली जाते. याव्यतिरिक्त या भागात 60 हजार सीआरपीएफ जवान तैनात असून, त्यातील 45 हजार जवान काश्मीरच्या खोऱ्यात कर्तव्य बजावत आहेत. तर, या संपूर्ण व्यवस्थेमध्ये 83 हजार जम्मू काश्मीर पोलिसांचाही समावेश आहे. शिवाय सीएपीएफच्याही काही तुकड्यांचा यात समावेश आहे.