नवी दिल्ली : बलात्कारासारख्या संतापजनक घटनांबाबत नेत्यांची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आलीय. 'एवढ्या मोठ्या देशात बलात्काराची एखाद दुसरी घटना घडते... त्यावर एवढं अवडंबर माजवू नका' असं वादग्रस्त विधान केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी केलंय.
राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांना एक-दोन बलात्काराच्या घटना सामान्य वाटतात. न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना संतोष गंगवार यांनी 'अशा घटना दुर्भाग्यूपर्ण असताता, पण कधी कधी त्या रोखल्या जाऊ शकत नाहीत. सरकार सगळ्या जागी सक्रीय आहे, कारवाई करतेय. एवढ्या मोठ्या देशात एक-दोन घटना घटल्या तर त्याचं एवढं अवडंबर माजवलं जाऊ नये' असं गंगवार यांनी म्हटलंय.
दरम्यान, एकीकडे केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी मुक्ताफळं उधळली असताना काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनीही वादग्रस्त विधान केलंय. शोले सिनेमातील गब्बरप्रमाणे पोलीस बलात्कार पीडितेला प्रश्न विचारतात असं विधान चौधरी यांनी पाटण्यात केलंय.
बारा वर्षाखालील मुलींवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशी देण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिलीय. केंद्रीय मंत्रीमंडळाने शनिवारी पोक्सो कायद्यात सुधारणा करुन वटहुकूम काढला होता. कठुआ, उन्नाव बलात्काराच्या घटनानंतर देशात संतापाची लाट उसळलीय. केंद्र सरकारने नवीन अध्यादेशाला मंजुरी दिल्याने १२ वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. १६ वर्षांवरील मुलीवर बलात्कार केल्यास कमीत कमी १० वर्षे ते २० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलीय... तसंच दोषीला जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूदही या कायद्यात आहे.