उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधल्या अमरोहा (Amorha) इथं एका कैद्याने पोलिसांच्या गाडीतून उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत त्याच्या पायाला गोळी लागली आणि पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. पोलिसांच्या चौकशीत कैद्याने (Prisoner) पळून जाण्याचं कारण सांगितलं. हे कारण ऐकून पोलिसही हैराण झाले. या कैद्याची कहाणी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे. (Wife affair with Prisoner)
वाजिद अली नावाच्या आरोपीला मुरादाबाद (Muradabad) तुरुंगातून पोलीस व्हॅनमधून अमरोहाला घेऊन जाण्यात येत होतं. यादरम्यान पोलिसांना धक्का देत वाजिद अलीने चालत्या व्हॅनमधून उडी मारली आणि फरार झाला. पोलिसांच्या सुरक्षेतून कैदी फरार झाल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ शोधकार्य सुरु केलं. पण एक दिवस उलटल्यानंतरही वाजिद खानचा शोध लागला नाही. त्यामुळे निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलीस व्हॅनच्या चालकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं.
पोलीस चकमकीत पकडला गेला
पोलिसांनी वेगवेगळी पथकं करत वाजिद खानचा शोध सुरु ठेवला. पोलिसांच्या तपासकार्याला अखेर यश आलं दोन दिवसातच वाजिद खानची माहिती पोलिसांना मिळाली. वाजिदला अटक करायला गेलेल्या पोलिसांबरोबर चकमक झाली. यात पोलिसांनी झाडलेली एक गोळी वाजिद खानच्या पायाला लागली आणि अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. अटक केल्यानंतर वाजिद खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी जबाब त्याने पोलिसांना त्याने फरार होण्याचं कारण सांगितलं.
पत्नीला शोधण्यासाठी फरार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाजिद वर्षभरापासून मुरादाबाद तुरुंगात बंद होता. तुरुंगात त्याची रिझवान नावाच्या दुसऱ्या कैद्याशी ओळख झाली. त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. वाजित तुरुंगात असताना त्याची पत्नी त्याला रोज भेटायला येत होता. वाजिदने पत्नीची रिझवानशी ओळख करुन दिली. यानंतर वाजिदची पत्नी आणि रिझवानमध्ये जवळीक वाढली.
तुरुंगात सुटल्यानंतर रिझवान वाजिदच्या पत्नीला भेटला आणि दोघंही फरार झाले. या गोष्टीची खबर वाजिदला तुरुंगात लागली आणि तो प्रचंड संतापला. त्याने रिझवानवर बदला घेण्याचा ठरवलं. पण तुरुंगात असल्यामुळे तो काहीच करु शकत नव्हता. अशातच त्याला एक संधी मिळाली. कोर्टात नेताना त्याने पोलिसांना चकमा देत धावत्या पोलीस व्हॅनमधून उडी मारली आणि फरार झाला. रिझवान आणि पत्नीला धडा शिकवण्यासाठी त्याने दोघांचा शोध सुरु केला. पण काही तासातच वाजित पकडला गेला.