Free Scooty Yojana 2022 : सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थीनींना मोफक मिळणार स्कूटी

Free Scooty Yojana 2022 : केंद्र आणि राज्य सरकारही मुलींना-तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. 

Updated: Jun 10, 2022, 08:33 PM IST
Free Scooty Yojana 2022 : सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थीनींना मोफक मिळणार स्कूटी title=

Free Scooty Yojana 2022 : केंद्र आणि राज्य सरकारही मुलींना-तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहेत, ज्याचा त्यांना थेट फायदा होत आहे. उत्तर प्रदेश सरकारची 'राणी लक्ष्मीबाई योजना' आहे, ज्याचा फायदा अनेक तरुणींना लवकरच मिळणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे. यूपी सरकारची ही योजना काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. (up state government free scooty will be given to college students under rani laxmibai scheme know what are rules and criteria)
 
राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत गुणवंत तरुणींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात भाजपच्या जाहीरनाम्यात या मुद्द्याचा उल्लेख करण्यात आला होता. 

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देण्यात येणार आहे. तरुणींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात येणार आहे. 

महाविद्यालये, विद्यापीठांव्यतिरिक्त खासगी विद्यापीठांचे विद्यार्थीही या योजनेचा लाभ घेऊ शकतील. ही योजना लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

योगी आदित्यनाथ सरकारकडून हिरवा कंदील मिळताच पात्र विद्यार्थिनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

कागदपत्रांची यादी

शैक्षणिक प्रमाणपत्रं, बँक खाते, पासपोर्ट आकाराचे फोटो, जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र आणि आधार कार्ड ही कागदपत्रं पात्र विद्यार्थिनींकडे   असणं आवश्यक आहे. तसेच कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं, अशीही अट आहे. 

या योजनेअंतर्गत सर्व गुणवंत विद्यार्थिनींना स्कूटी खरेदी करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. स्कूटी मिळाल्यानंतर विद्यार्थींनीना कॉलेजला जाणं सोपं होईल. या स्कूटी योजनेच्या माध्यमातून सरकारला मुलींना थेट शिक्षणाशी जोडायचे आहे. 

या आहेत अटी 

-विद्यार्थींनीचं विद्यापीठ किंवा महाविद्यालयात शिक्षण सुरु असावं. 
-10वी/12वी मध्ये 75 टक्के गुण असावेत. 
-बँक खाते आधारशी जोडलेले असावे.
-योजनेसाठीचे अर्ज केवळ ऑनलाइन वैध असतील.
-विद्यार्थ्याने इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 

निवड कशी होणार?

सर्व गुणवंत विद्यार्थिनींचा माहिती मिळाल्यानंतर सरकार या योजनेवर बजेटनुसार काम करेल. विद्यार्थिनींच्या निवडीसाठी बारावीच्या गुणांचा आधार घेतला जाईल. दुसरीकडे, पोस्ट ग्रॅज्युएशन विद्यार्थींनीसाठी, त्यांच्या पदवीचे गुण आधारभूत केले जातील. त्यानंतर ज्या विद्यार्थिनींची निवड होईल, त्यांना मोफत स्कूटी योजनेचा लाभ मिळणार आहे.