अल कायदाला आर्थिक मदत करणारा तेलंगणातील इंजिनियर अखेर भारताच्या ताब्यात

अमेरिकेकडून सोपवण्यात आला भारताच्या ताब्यात 

Updated: May 21, 2020, 09:39 PM IST
अल कायदाला आर्थिक मदत करणारा तेलंगणातील इंजिनियर अखेर भारताच्या ताब्यात  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : अमेरिकेकडून एका कुख्यात दहशतवाद्याला भारताकडे सोपवण्यात आलं आहे. इब्राहिम जुबैर मोहम्मद असं नाव असणाऱ्या या दहशतवाद्याला १९ मे रोजी भारतात आणण्यात आलं. ज्यानंतर त्याला अमृतसर येते क्वारंटाईम सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. 

मुळचा हैदराबाद येथील असणारा जुबैर हा अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी आर्थिक व्यवहारांचं काम पाहत होता. अमेरिकेच्या न्यायालयाकडून दहशतवादी कारवायांसाठी त्याला दोषी ठरवण्यात आलं. 

२०११ मध्ये इब्राहिम जुबैर याला अमेरिके अटक करण्यात आलं होतं. मुळचा तेलंगणातील असणारा हा इब्राहिम एक इंजिनिअरही आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेमध्ये त्याने शिक्षा पूर्ण केली आहे. ज्यानंतर आता त्याला भारताकडे सोपवण्यात आलं आहे. 

 

इब्राहिमला  ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर त्याचा भाऊ याह्या मोहम्मद याला २७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्याच्या घडीला इब्राहिमची चौकशी करण्यात येत असून देशातील दहशतवादी कारवायांशी त्याता काही संबंध आहे का, याची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.