Indore News : सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडीओ (Shocking video on social media) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर एकच प्रश्न पडतो, आजही महिला सुरक्षित आहेत का? सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर होतोय. हा व्हिडीओ म्हणजे माणुकीसा काळीमा फासणारा आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुन्नसान परिसरात एका धावत्या कारमध्ये एका तरुणीची किंचाळी ऐकू येतं होती. ती आपली इज्जत वाचविण्यासाठी मदतीची हाक मारतेय...ती गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना नराधम तिला आत खेचतोय आणि तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता एक बाईकस्वार तिथे येतो आणि सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद करतो. तेवढ्यात ओलीस (girl hostage) ठेवण्यात आलेली तरुणी आपल्या जीव वाचवत आणि स्वत:ला सावरत गाडीतून उडी मारते. (video man in car misbehaving with hostage girl viral on social media nmp)
बाइकस्वारांना पाहून कारचालकाने तिथून पळ काढला. बाइकस्वारांनी त्वरित पोलिसांना कारचा नंबर दिला. ही घटना इंदोरच्या पॉश कॉलनीतील आहे. पोलिसांनी कार नंबरच्या आधारावर तपास सुरु केला आहे. दरम्यान तरुणी पोलीस स्टेशनला गेली असता तिथे आलेल्या पत्रकारावर तिने कानशिल्यात लगावली. ही घटनाही कॅमेऱ्यात कैद झाली.
इंदौर- कार में बचाओ बचाओ कर चिल्लाने वाली लड़की ने मीडियाकर्मियों से की बदसलूकी,कवरेज करने गए रिपोर्टर को मारा थप्पड़,उसके बाद लगाई दौड़,पुलिस ने बुलाया था बयान दर्ज करवाने@vikassingh218 pic.twitter.com/Cb3cpPvK2B
— Ankit Rajak (@Repoterankit) November 5, 2022
या घटनेनंतर तरुणीने तिथून पळ काढला. पत्रकारावर हात उचल्यामुळे इंदोरमधील पत्रकारांमध्ये या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येतो आहे.