नवी दिल्ली: देशात दसऱ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीनं हा उत्सव साजरा केला जात आहे. कुठे दुर्गा विसर्जनात भाविक भावुक होताना दिसत आहेत. तर कुठे रावण दहनाचा कार्यक्रम सुरू आहे. देशभरातील लोक आज दसरा साजरा करत आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क रावण डान्स करताना दिसत आहे. रामलीलाचा कार्यक्रम सुरू असताना अचानक या नाटकात रावण बनलेला व्यक्ती भांगडा करताना दिसत आहे. रावणाचा हा व्हिडिओ जुना असल्याचं काही लोकांचा कयास आहे. रावण दहनाआधी तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
30-सेकंदाच्या व्हिडीओमध्ये पंजाबमध्ये रामलीला दरम्यान, 'रावण'ची वेशभूषा केलेला व्यक्ती पंजाबी गाण्यावर भांगडा करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. डान्स करणाऱ्या या व्यक्तीच्या हातात एक बंदूक देखील दिसत आहे.
Kra lao Punjab vich Ramayanpic.twitter.com/f3MxQZQhjM
— ਅਦਨਾਨ ਅਲੀ ਖਾਨ ( عدنان علی خان ) (@AdnanAliKhan555) October 13, 2021
3-4 ਸਾਲ ਰਾਮਲੀਲਾ ਤੇ ਯਾਤਰਾ ਵਾਲੇ ਦਿਨ ਪੂਰਾ ਜਲੂਸ ਨਿਕਲਣ ਲੱਗ ਪਿਆ
ਪਤਾ ਨਹੀ ਲੋਕਾਂ ਦੀਆ ਧਾਰਮਿਕ ਬਦਲ ਗਈਆ ਜਾਂ ਧਾਰਮਿਕ ਭਾਵਨਾ ਸਿਰਫ ਮੰਨੋਰੰਜਨ ਬਢ ਕੇ ਰਿਹ ਗਈ pic.twitter.com/QbBCVMLmfN— (@UttamSingh983) October 13, 2021
हा व्हिडिओ अदनान अली खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला 25,000 पेक्षा लोकांनी पाहिलं आहे. 200 हून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे. ट्वीटर यूझर्सने कॅप्शन देताना म्हटलं की, 'ही एक हृदयस्पर्शी आणि आनंददायक गोष्ट आहे जी मी आज पाहिली...'
सूचना- झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.