Snake Viral Video : सापाचं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो. सापाच्या एका दंशाने आपण मृत्यूचा दारात पोहोचतो. जंगल आणि जंगल परिसरातील गावांमध्ये विषारी साप, अजगर, नाग सर्रास दिसतात. साप हे विषारी आणि बिनविषारी असतात. पण लोकांना तो दिसला की मग सापाची पण काही खैर नसते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. कधी साप दुचाकीतून निघतो तर कधी हेल्मेटमध्ये दडलेला असतो.
मध्यतरी सापाचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात साप एका महिलेची चप्पल घेऊन फरार होतो. सापाचे अनेक व्हिडीओ रोज अगदी प्रत्येक क्षणाला व्हायरल होतात असं म्हणं पण वावग ठरणार नाही. पण तुम्ही सापाच्या रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ कधी पाहिला आहे का? (viral Snake video man rescue snake from pipe Shocking video Trending on Internet )
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. तो व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त यूजर्सने पाहिला आहे. तुम्ही पाहिला आहे का हा व्हिडीओ? काय आहे असं या व्हिडीओमध्ये...तर आम्ही सांगतो तुम्हाला एक भलामोठा साप एका पाईपमध्ये अडकला होता. एका तरुणाने रेस्क्यू करुन सापाचा बचाल केला.
तरुणाने ज्या हिम्मतीने आणि हाताने न घाबरता पाईपातून सापाची सुटका केली. हा सगळ्या थरार या व्हिडीओमध्ये आहे. तुम्ही पाहू शकता काळा जीन्स पॅन्ट आणि निळा, पांढऱ्या रंगाची टीशर्ट घातलेला तरुण हाताने हो हाताने घराच्या मागील बाजूस मैदानात पाण्याचा एका पाईपमधून साप काढताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये पाहू शकता त्या पाईपातून पाणी बाहेर येतं आहे आणि सापाची फक्त शेपटी दिसतं आहे. त्या तरुणाने शेपटीला पकडून त्या सापाची पाइपातून मुक्तता केली.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरील सागर पाटील या नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडीओला यूजर्सकडून पसंती मिळतं असून मोठ्या प्रमाणावर हा व्हिडीओ पाहिला जातो आहे.
एका अजून व्हायरल व्हिडीओमध्ये तब्बल 15 फुटाचा महाकाय कोब्रा घरात घुसल्याची घटना दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये एका सर्पमित्राने या महाकाय कोब्राला कसं पडकलं हे चित्र करण्यात आलं आहे. या कोब्राची लांबी आणि जाडी पाहून यूजर्स अवाक् झाले आहेत.
King Cobra’s are vital in the food chain for maintaining balance in nature. Here is one nearly 15 feet long rescued & released in the wild.
Entire operation is by trained snake catchers. Please don’t try on your own. With onset of rains, they can be found in all odd places. pic.twitter.com/g0HwMEJwp2
— Susanta Nanda (@susantananda3) May 4, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवरील Susanta Nanda या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.