सहारनपुर : BSF चा हा जवान पान सिंह तोमरच्या पावलावर चालण्यास तयार.
या जवानाने पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायासाठी विनवणी केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अजय सिंह नावाच्या BSF जवानाने आपल्यावर अन्याय होत असल्याचं सांगितलं आहे. या जवानाने सांगितलं आहे की, जर मला न्याय मिळाला नाही तर मी देशाच्या ऐवजी घराच्या सुरक्षेसाठी शस्त्र हातात घेईन.
पोलिसांच्या वागणुकीला कंटाळत त्याने हा चेतावनी देणारा व्हिडिओ तयार केला आहे. तातरपुरच्या या बीएसएफ जवानाने सांगितले की, माझ्या कुटुंबियांना त्रास दिला जात आहे जर मला पोलिसांकडून योग्य ती मदत नाही मिळाली तर मी माझ्या कुटुंबांच्या सुरक्षेसाठी शस्त्र हातात घेईन.
हा जवान भारत - बांग्लादेश बॉर्डरवर तैनात आहे. अजय सिंहने स्वतः हा व्हिडिओ तयार केला आहे. त्याने सांगितले की, पट्टयाच्या जमिनीवरील शेतावर ट्रॅक्टर चालवून पोलिसांनी ती जागा बळकावली आहे. ती जागा मिळवण्यासाठी त्याला न्याय हवा आहे. यासाठी हा व्हिडिओ अजय सिंहने तयार केला असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.