Manjulika आणि Money Hiest च्या Viral Video ची पोलखोल, सत्य जाणून बसेल धक्का

Fact Check :  गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यातील Manjulika आणि Money Hiest या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे. ते सत्य जाणून तुम्हाल धक्का बसेल. 

Updated: Jan 25, 2023, 02:09 PM IST
Manjulika आणि Money Hiest च्या Viral Video ची पोलखोल, सत्य जाणून बसेल धक्का title=
Viral Video Manjulika Money Hiest delhi metro Fact Check commercial ad video shoot

Manjulika & Money Hiest Viral Video Fact Check  : सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळविण्यासाठी, व्हायरल, लाइक्स आणि पैशांसाठी नेटकरी वेगवेगळे रील्स तयार करतात. ते सोशल मीडियावर व्हायरल पण होतात. काही यूजर्स एका क्षणात प्रकाशझोतात येतात. पण काहींना ते शक्य होतं नाही. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि पैशांसाठी तरुण पिढी एकही जागा सोडत नाही आहेत. बघावं तिकडे ही तरुण पिढी रील्स काढताना दिसतात. गेल्या काही दिवसांमध्ये मेट्रोमधील व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. त्यातील मंगळवारी अचानक Manjulika आणि Money Hiest चे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओमागील सत्य समोर आलं आहे. 

हे आहे व्हिडीओमागील सत्य (Fact Check)

हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेट्रोतील प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. अनेकांनी अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी रील्स करण्यावर आक्षेप व्यक्त केला. हे दोन व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशन (NMRC) ने देखील चौकशीची मागणी केली. त्यानंतर NMRC अधिकाऱ्यांनी सांगितले की हे मेट्रोतील व्हिडीओ एका शूटिंगचा भाग होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The RealShit Gyan (@the.realshit.gyan)

पण हे व्हिडीओ इतक्या झपाट्याने व्हायरल झालेले की नोएडा प्राधिकरणाचे सीईओ आणि NMRC व्यवस्थापकीय संचालकांनाही याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागले. (Viral Video Manjulika Money Hiest delhi metro Fact Check commercial ad video shoot)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by boAt (@boat.nirvana)

रितू महेश्वरी या म्हणाल्या की, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हे व्हिडिओ एका व्यावसायिक जाहिरातीच्या शूटिंगचा एक भाग आहे. NMRC च्या धोरणानुसार 22 डिसेंबरला हे शूटिंग झालं असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

त्यापुढे म्हणाल्या की, या शूटिंगचा व्हिडिओ मॉर्फ करून एडिट करण्यात आला आहे. NMRC कॉरिडॉरमधील बोट एअर डोप्ससाठी मेसर्स क्रिएटिव्ह प्रोडक्शनद्वारे ही जाहिरात फिल्म शूट करण्यात आली.