...तर पंतप्रधान मोदींना तुरुंगात धाडेन - ममता बॅनर्जी

'अगोदर निवडणूक आयोग पारदर्शी असल्याचं दिसत होतं परंतु, भारताची जनताच आता म्हणतेय की भाजपनं निवडणूक आयोगाला खरेदी केलंय'

Updated: May 16, 2019, 03:15 PM IST
...तर पंतप्रधान मोदींना तुरुंगात धाडेन - ममता बॅनर्जी  title=

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी राज्यातील मथुरापूरमध्ये टीएमसीच्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकतामध्ये अमित शहांच्या रोड शोम्ध्ये झालेल्या हिंसेत टीएमसीचा सहभाग असल्याचे पुरावे द्यावेत, अन्यात त्यांना तुरुंगात धाडेन, अशी गर्जना केलीय. 

'निवडणूक आयोग भाजपाचा भाऊ आहे. अगोदर निवडणूक आयोग पारदर्शी असल्याचं दिसत होतं परंतु, भारताची जनताच आता म्हणतेय की भाजपनं निवडणूक आयोगाला खरेदी केलंय. मला दु:ख होतंय पण यासाठी मी काहीही करू शकत नाही. यासाठी भाजप मला तुरुंगात टाकू शकतं, यासाठी मी तयार आहे. खरं बोलण्यासाठी मी कधीही घाबरणार नाही, हेच मला शिकवलं गेलंय' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. 

शुक्रवारी कोणतीही रॅली होणार नाही, याची माहिती आपल्याला बुधवारी सायंकाळी मिळाल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. यामुळेच त्यांनी शुक्रवारचे सगळे निवडणूक कार्यक्रम गुरुवारीच घेण्याचा निर्णय घेतलाय. 

राज्यात निवडणूक प्रचाराची वेळ कमी करण्याचा निवडणूक आयोगानं निर्णय जाहीर केलाय. त्यानंतर या मुद्यावर विरोध पक्षनेत्यांनी सोबत आवाज उचलल्यानं त्यांचेही आभार ममता बॅनर्जी यांनी मानलेत. 'बंगालच्या जनताप्रति समर्थ आणि एकजुटता दाखवण्यासाठी मायावती, अखिलेश यादव, काँग्रेस, एन चंद्राबाबू नायडू यांचे आभार. भाजपच्या आदेशावर निवडणूक आयोगाचा निर्णय संपूर्णत: पक्षपातपूर्ण आहेच पण हा लोकशाहीवर थेट हल्ला आहे' असं ट्विट ममतांनी केलंय.