Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खराब हवामानामुळे ममता बॅनर्जी यांच्या हेलीकॉप्टरचं अचानक लँडिंग (Emergency Landing) करण्यात आलं. यावेळी घाईगडबड झाल्याने ममता बॅनर्जी यांच्या पायाला आणि पाठिला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांचं हेलीकॉप्टर (Helicopter) खराब हवामानामुळे सिलीगुडी जवळच्या सेवोके विमानतळावर उतरवण्यात आलं.
ममता बॅनर्जी या जलपायगुडी इथल्या एका रॅलील संबोधित करण्यासाठी जात होत्या. यावेळी बैकुंठपूर जंगलावरुन जाताना त्यांचं हेलकॉप्टर खराब हवामानामुळे भरकटलं. हवामान अचानक बिघडलं आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यामुळे हेलकॉप्टरच्या पायलटने इमरजेंसी लँडिंगचा निर्णय घेतला. हेलिकॉप्टर लँड करताना ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली. पंचायत निवडणुकी निमित्ताने मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या काही भागांचा दौरा करतायत. पश्चिम बंगालमध्ये 8 जुलैला पंचायत निवडणूक होणार आहे.
पंचायत निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये काहीठिकाणी हिंसा झाली. कूचबिहारमधल्या दिनहाटा इथं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या रॅलीनंतर जोरदार हिंसा झाली. तृणमुल काँग्रेसचे दोन गट आपापसात भिडले. यावेळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत टीएमसीचा एक कार्यकर्त्याचा गोळी लागून मृत्यू झाला. तर अने कार्यकर्ते जखमी झाले.
मंगळवारी सकाळी दोन गटात हिंसेला सुरुवात झाली, काही वेळातच हिंसेचे लोण संपूर्ण शहरात पसरलं. दोन गटात दगडफेक आणि गोळीबाराच्या घटना घडल्या. यात पाच लोकं गंभीर जखमी झाले आहेत. दिहहाटा हे आंतराष्ट्रीय सीमेपासून जवळ असलेलं गाव आहे. इथं पोहोचण्यासाठी केवळ बोटीचा वापर केला जातो. दिनहाटा इथं झालेल्या हिंसेत बांगलादेशातल्या गुन्हेगारांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येतोय. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
ममता बॅनर्जी यांची ओळख
ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालचं मुख्यमंत्री पद सांभाळणाऱ्या पहिल्या महिला आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून वेगळं झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी 1998 मध्ये अखिल भारतीय तृणमुल काँग्रेसची स्थापना केली. पक्षाच्या त्या अध्यक्षा बनल्या. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना दीदी म्हणून ओळखलं जातं. ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955 मध्ये (Date of Birth) कोलकातातल्या एका हिंदू ब्राम्हण कुटुंबात (Bengali Hindu Brahmin) झाला. ममता 17 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं.