जोधपूर : लैंगिक अत्याचार प्रकरणी 5 वर्षापासून तुरुंगात असलेले आध्यात्मिक गुरु आसाराम बापूच्या शिक्षेवर थोड्याच वेळेत सुनावणी होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जेलमध्येच ही सुनावणी होणार आहे. जेलच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आसाराम बापूंना कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं आहे. 2013 मध्ये शाहजहांपूरच्या 16 वर्षाच्या मुलीने आसाराम यांच्यावर जोधपूर आश्रममध्ये बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हापासून आसाराम हे जेलमध्ये आहेत. 56 महिन्यांनंतर आता काय निर्णय येणार याकडे लक्ष आहे.
जर आसाराम यांना शिक्षा झाली तर केंद्रीय कारागृहाकडून विशेष कोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळाल्यानंतर त्यांचे वकील गुरुवारी राजस्थान उच्च न्यायालात शिक्षेविरोधात याचिका करु शकतात.
निर्णयाची प्रत मिळायला उशीर लागतो आणि वकिलांना त्याचा अभ्यास करण्यासाठी देखील वेळ लागेल त्यामुळे शुक्रवारी वकील कोर्टामध्ये याचिका दाखल करतील असं बोललं जातंय. शनिवारी कोर्ट बंद असल्याने आसाराम यांच्या शिक्षेविरोधातील याचिकेवर सोमवारी सुनावणी होईल.
या प्रकरणात आसाराम यांना जामीन मिळाला किंवा सूटका झाली तर गुजरातमध्ये सुरु असलेल्य़ा आणखी एका प्रकरणात त्य़ांना लगेचच न्यायालयीन कोठडी होऊ शकते. त्यामुळे त्यांना लगेचच गुजरात पाठवलं जाऊ शकतं. गुजरात पोलीस बुधवारी त्यांना ताब्यात घेण्यासाठी येतील. गुजरातमध्ये देखील आसाराम यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल आहे.
राजस्थान सरकार देखील आसाराम यांची सूटका झाली तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करु शकते. ही याचिका कधी दाखल केली जाऊ शकते हे सरकारवर अवलंबून आहे. या प्रकरणात सुनावणी खूपच धिम्या गतीने सुरु असल्याने सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला फटकारलं होतं. जर आसाराम दोषी ठरले तर त्यांना 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते.
आतापर्यंत 12 वेळा आसाराम यांचा जामीन अर्ज ट्रायल कोर्ट, राजस्थान हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे.