मुंबई : कर्नाटकातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपचे आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष के जी बोपय्या यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांनी के जी बोपय्या यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली आहे. के जी बोपय्या कोडागू जिल्ह्यातल्या विराजपेटचे आमदार आहेत. येडियुरप्पा यांच्या सरकारमध्ये २००९ ते २०१३ पर्यंत ते विधानसभेच्या अध्यक्षपदी होते. त्यामुळे भाजपनं अनुभवी आमदाराला हंगामी अध्यक्षपदावर बसवलंय.
मात्र सर्वोच्च न्यायालयानं सर्वात ज्येष्ठ आमदाराला अध्यक्षपदी बसवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याचे पालन न केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. त्यामुळे या नियुक्तीवरूनही वाद पेटण्याची चिन्ह आहेत. परंतु, के. जी. बोपय्या यांच्या निवडीला काँग्रेसनं जोरदार आक्षेप घेतलाय. 'कायदेशीर बाबी तपासून मग आपण यावर भूमिका मांडू असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं. या मुद्द्यावरही आमच्यापुढचे सगळे मार्ग खुले आहेत... परंतु, या मुद्यावर आम्ही कोर्टात कधी जाऊ ते आत्ताच सांगता येणार नाही' असं बोपय्या यांनी म्हटलंय.