नवी दिल्ली : अनेकांना इंग्रजी भाषा बोलताना अडचणी येतात. शिक्षण न झाल्यामुळे किंवा योग्य शब्द न सुचल्यामुळे इंग्रजी बोलता येत नाही.
दारुड्यांना बिनधास्तपणे इंग्रजी बोलताना तुम्ही अनेकदा पाहीलं असेल. असं का होतं? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत.
दारु प्यायल्यानंतर बोलताना दारुड्यांच्या तोंडातून आपोआप दुसऱ्या भाषेचे शब्द निघण्यास सुरुवात होते. त्यावेळी शब्दांचा अडथळाही त्यांना येत नाही. पणं असं होण्यामागचं नेमकं कारण काय असावं?
दारुडे इंग्रजी का बोलतात हे आम्ही सांगत नाहीयेत तर एका सर्व्हेक्षणात ही बाब समोर आली आहे. सायंस मॅगझिन 'जर्नल ऑफ सायकोफार्माकोलॉजी'मध्ये छापण्यात आलेल्या वृत्तानुसार, थोडीशी दारु कुणालाही दुसऱ्या भाषेत बोलण्यास मदत करते.
दारु आपली स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रीत करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतं. मात्र, दारु पिल्याने अनेकांचा आत्मविश्वास वाढतो असंही अनेकदा पहायला मिळालं आहे.
ज्यावेळी आपण एकाद्या दुसऱ्या व्यक्तीला भेटतो आणि बोलतो त्यावेळी या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या भाषेच्या क्षमेतेवर होतो.
युनिव्हर्सिटी ऑफ लिवरपूल, ब्रिटनमधील किंग्ज कॉलेज आणि नेदरलँड्स युनिव्हर्सिटी ऑफ मास्ट्रिचच्या संशोधकांनी एक संशोधन केलं. या संशोधनात करण्यात आलेल्या टेस्टमध्ये ५० जर्मन नागरिकांच्या समुहाची निवड करण्यात आली ज्यांनी नुकतीच डच भाषा शिकली होती.
यापैकी काहींना पिण्यासाठी ड्रिंक दिली ज्यामध्ये थोड्याप्रमाणात अल्कोहल होतं. लोकांच्या वजनानुसार त्यांच्या ड्रिंक्समध्ये अल्कोहोलचं प्रमाण ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर जर्मन नागरिकांना नेदरलँड्सच्या नागरिकांसोबत डचमध्ये बोलण्यास सांगितलं.
डच भाषिकांना हे माहित नव्हतं की, कुणी दारु प्यायली आहे आणि कुणी नाही. यानंतर समोर आलं की, ज्यांनी दारु प्यायली होती ते चांगल्या प्रकारे उच्चारण करत होते.