बिहार : बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातून एक अशी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे अनेकांनाच धक्का बसला आहे. असे सांगितले जात आहे की, येथे एक महिला सरपंच आपलं पद आणि खूर्ची सोडून आपल्या प्रेमीसोबत पळून गेली आहे. आपलं दिलेलं किंमती वोट वाया गेलं म्हणून गावकऱ्यांना खूप राग आला आहे. तसेच ही आपली आणि गावाची फसवणूक असल्याचं देखील गावकऱ्यांचं मत आहे. असे सांगितले जाते की, या महिलेला पंचायतीच्या लोकांनी विकासासाठी मतदान करून सरपंच बनवलं, परंतु ती महिला महिला आपल्या प्रियकरासह पळून गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कान्होली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोपरा पंचायतीच्या लोकांनी पंचायत निवडणुकीत आपले अमूल्य मत देऊन महिला रेखा देवी यांना सरपंच केलं होतं.
गावकऱ्यांनी सांगितले की, रेखा देवी आपली खूर्ची आणि मुलं सोडून प्रियकरासह पळून गेली आहे. रेखादेवीच्या या प्रकारानंतर गावात नाराजी पसरली आहे.
या घटनेनंतर सरपंच महिलेच्या नवऱ्याने गावातीलच दोन भावांविरुद्ध आपल्या बायकोचं लग्न करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
रेखादेवी 9 मार्च रोजी सकाळी घरातून कामासाठी निघाली होती, परंतु त्यानंतर ती बेपत्ता आहे. नातेवाइकांनी तिला शोधन्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तरीही ती सापडली नाही. त्यानंतर पत्नीच्या प्रेमप्रकरणाचा पर्दाफाश करत पतीने गावातील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सध्या पोलीस तपासात गुंतले आहेत. त्यांनी प्रकरणी गावातील ते दोन भाऊ आणि त्यांच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल केलेल्या त्या दोन भावांचं नाव संजय कापर आणि विजय कापर आहे असे सांगण्यात येत आहे. तर त्यांच्या वडीलांचे नाव राम प्रभास कापर आहे.