नवी दिल्ली : झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी झीलचे (Zee Entertainment Enterprises Ltd) संस्थापक डॉ सुभाष चंद्रां यांची (Dr Subhash Chandra) मुलाखत घेत आहेत. या सर्वात मोठ्या मुलाखतीत सुभाष चंद्रा हे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहेत, ज्याबाबत देशातील लोकांना आणि भागधारकांना जाणून घ्यायचंय. हे प्रश्न यासाठीही महत्त्वाचे आहेत कारण झी इंटरटेन्मेंट आणि सोनी पिक्चर्सच्या विलिनिकरणाच्या घोषणेनंतर इन्वेस्कोच्या हेतूवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यामागे नक्की कोणाचा हात आहे तसेच इन्वेस्को या सर्व प्रश्नांपासून पळ का काढतोय? (zeel founder dr subhash chandra interview on invesco matter with sudhir chaudhary)
प्रश्न : तुम्ही 1992 मध्ये झी टीव्ही लाँच केला. त्यानंतर भारताच्या अनेक पिढ्या झी टीव्ही बघत मोठ्या झाल्या पण आज त्याच झी टीव्हीला परदेशी कंपनीपासून म्हणून धोका आहे, तुम्ही याकडे किती गंभीरतेने पाहता?
उत्तर : आपल्या देशात दूरदर्शन हे एकमेव चॅनल असताना झी टीव्ही सुरू झालं. दूरदर्शनला त्याच्या मर्यादा आहेत. दूरदर्शनला सार्वजनिक सेवा प्रसारक म्हणून काम करावे लागते, त्यामुळे ते जास्त मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवू शकत नाहीत. जागा रिक्त होती म्हणून 1992 मध्ये झी आलं आणि आणि ही उणीव भरुन काढली. आज कोणी 10 लाख कोटी रुपये खर्च केले तरी ते पुन्हा निर्माण करता येणार नाही. झी नेटवर्क पाहून देशातील 3 ते 4 पिढ्या मोठ्या झाल्या.
झीवर सर्वांनी भरभरुन प्रेम केलं आहे. आजही आमच्या मुंबईतील गोडाऊनमध्ये 1992 ते 1996 या काळातील अजूनही 10 कोटी पत्रं पडून आहेत. तर हे चॅनेल माझे चॅनल नाही, हे चॅनेल इन्व्हेस्कोचं नाही, हे चॅनेल देशातील अडीच लाख भागधारकांचे चॅनेल आहे. 1994 मध्येही परदेशी लोकांनी त्यावर हल्ला केला होता. त्यावेळी मला एका परदेशी कंपनीने 500 दशलक्ष डॉलर्सची ऑफर दिली होती.
मी त्या कंपनीला त्या वेळीही सांगितले होते, 'india Is not For Sale.' आजही अशी परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे, म्हणून मी म्हणतो की इन्व्हेस्को हा भागधारक आहे, तो मालक नाही. त्यांनी शेअरहोल्डरसारखे वागावे आणि मालकासारखे नाही. जे भागधारक आहेत, जे 2.5 लाख लोकं मालक आहेत त्यांना निर्णय घेऊ द्या.
प्रश्न : तुमच्या मते आज झी टीव्हीचा मालक कोण आहे?
उत्तर : 2.5 लाख भागधारक, जनता. या नेटवर्कचा मालक एकटा व्यक्ती नाही. या देशातील 90 कोटी दर्शक जे दररोज झी टीव्ही पाहतात ते मालक आहेत. भारतातील 90 कोटी लोकं आणि 60 कोटी लोक परदेशात पाहतात, ते 150 कोटी लोकं मालिक आहेत. कोणीही व्यक्ती त्याचा मालक नाही, मी देखील त्याचा मालक नाही.
ZEE ने या प्रकरणी मोहीमही सुरू केली आहे. चीनचे षड्यंत्र पाहून झीने #DeshKaZee मोहीम सुरू केली आहे. या हॅशटॅगमध्ये सामील होऊन तुम्ही देशातील पहिल्या आणि भारतीय वाहिनीला देखील समर्थन देऊ शकता. तुम्हाला सांगू, बॉलिवूडच्या दिग्गज निर्माता-दिग्दर्शकांनीही ZEE च्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. यामध्ये सुभाष घई, सतीश कौशिक, बोनी कपूर, मधुर भांडारकर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.