ठाणेकरांसाठी खूशखबर! बारवी धरण भरले

या धरणाच्या दरवाज्यांचे काम पूर्ण झाल्यावर याच धरणात आणखी पाणी साठा वाढवता येणार आहे.

Updated: Jul 22, 2018, 07:32 PM IST
ठाणेकरांसाठी खूशखबर! बारवी धरण भरले title=

ठाणे: कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं एमआयडीसीचं बारवी धरण भरून वाहू लागलंय. त्यामुळे शनिवार रात्रीपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. बारवी धरणाची उंची वाढल्यावर या धरणाची क्षमता वाढली असून आता धरणात  238  दशलक्ष घनमीटर एवढा पाणी उपलब्ध झालाय. यापूर्वी हा साठा १७८ दशलक्ष घनमीटर एवढा होता. या धरणाच्या दरवाज्यांचे काम पूर्ण झाल्यावर याच धरणात आणखी पाणी साठा वाढवता येणार आहे. 

बारवी धरणातून अंबरनाथ, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मिरा, भाईंदर या महापालिका आणि औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी धरण जुलै महिन्यातच १०० टक्के भरल्याने तसेच धरणाची उंची वाढवल्याने अत्ता पूर्वी पेक्षा धरणात ४० टक्के अतिरिक्त पाणी साठा राहणार आहे.