सिंधुदुर्ग: मराठा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीपूर्वी मार्गी न लागल्यास सरकारला मोठा फटका बसेल, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केले आहे. त्यांनी शनिवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नारायण राणे यांनी म्हटले की, सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सोडवावा. अन्यथा भाजपला याचा मोठा फटका बसेल, असे राणेंनी सांगितले.
न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न तुर्तास सोडवता येऊ शकतो. एवढी क्षमता सरकारमध्ये आहे. मात्र, त्यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. केवळ कारणं सांगून चालणार नाहीत. जर सरकार कारणंच सांगत राहिलं तर त्याचा फटका या निवडणुकीत सरकारला बसेल, असे नारायण राणेंनी सांगितले.