How To Get Rid Of Mosquitoes From Home: ऋतू बदल होताना डासांचा प्रादुर्भाव वाढतो. डास चावल्याने त्वचेवर पुरळ उठल्याप्रमाणे त्वचेला सूज येते. मात्र डासांचा धोका इतक्यापुरता मर्यादित नसून डेंग्यू, मलेरियासारखे आजही डासांमुळे होऊ शकतात. बाजारात अनेक प्रकारचे मॉस्किटो रिपेलंट म्हणजेच डासांना दूर ठेवणाऱ्या क्रिम मिळतात. अनेकजण याच क्रिमचा वापर करतात. मात्र एका मर्यादेनंतर या क्रिम फारश्या प्रभावी ठरत नाहीत. दिवसभर घरात डास पळवून लावण्यासाठी कॉल सुरु ठेवंही घातक ठरु शकतं. कारण या कॉइलमध्ये रसायने असतात.
डास पळवून लावण्यासाठी अनेकजण घरगुती गोष्टींचा वापर करतात. तुम्ही सुद्धा यापैकी अनेक गोष्टी यापूर्वी कधीच ट्राय केल्या नसतील. यापैकी अनेक गोष्टींबद्दल समजल्यानंतर तुम्ही, अरे हे फारच सहज शक्य आहे, असंही म्हणाल. तुमच्या घरात मोहरीचं तेल, लवंग आणि लिंबू असेल तर या 3 गोष्टींचा वापर करुन डास कसे पळवायचे ते पाहूयात...
> लिंबू आणि मोहरीचं तेल तुमच्या स्वयंपाक घरात असेलच. हिवाळ्यामधून उन्हाळ्यात किंवा उन्हाळ्यातून पावसाळ्यात ऋतू बदल होताना डासांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढते. चुकून सायंकाळी घराची दारं-खिडक्या उघड्या राहिल्या की डासांचा त्रास रात्रभर सहन करावा लागणार असं समजाच.
> सायंकाळी थकून घरी आल्यानंतर डास मारण्याचा पराक्रम करावा लागू नये असं तुम्हालाही वाटत असेल तर लिंबू आणि मोहरीच्या तेलाचा वापर करण्याची ट्रीक नक्कीच ट्राय करुन पाहा. यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवता येतं.
> मोठ्या आकाराचं एक पिकलेलं लिंबू डास पळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं ठरेल. तसेच 2 ते 3 लवंगही यासाठी लागतील. कापसाची वात, थोडा कापूर आणि एक चमचाभर मोहरीचं तेल यासाठी लागेल.
> लिंबू वरच्या बाजूला गोलाकार कापून घ्या. हा लिंबू नेहमी कापतो त्याप्रमाणे अर्ध्यातून कापून 2 तुकडे करायचे नाहीत हे लक्षात घ्या.
> वरील बाजूने साल काढलेलं लिंबू हळूहळू पिळा. चमचाच्या मदतीने हळूहळू साल काढलेल्या भागापासून लिंबाच्या आतील गर बाहेर काढून घ्या. लिंबाचं केवळ साल राहिलं पाहिजे असा प्रयत्न लिंबाचा गर काढता ठेवा. आता या पोकळ झालेल्या लिंबामध्ये मोहरीचं तेल घाला. यामध्ये लवंग आणि कापूरही टाका. यातच वात टाकून हा अनोखा दिवा पेटवा.
> घराची सर्व दारं-खिडक्या बंद करुन घ्या. या दिव्याचा धूर घराबाहेर जाऊ नये म्हणून ही काळीज घ्यावी. या धुराचा गंध डासांना आवडत नाही. त्यामुळे काही क्षणात घरातील डास दिसेनासे होतील.
> रात्री झोपतानाही तुम्ही ही ट्रीक वापरु शकता. तसेच झोपताना तुमच्या शरीराच्या खुल्या भागांना म्हणजेच हात, पायाला तेल लावल्यानेही डास चावण्याचं प्रमाण कमी होतं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)