लग्न हे कोणत्यताही व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. लग्न हे मुलगा असो किंवा मुलगी दोघाच्या आयुष्यतील एक महत्वाचा क्षण असतो. प्रत्येकजण स्वतःच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक असतो. विविध देशामध्ये लग्नाच्या वेगवेगळ्या परंपरा विधी आणि पद्धती असतात. या दिवशी छान दिसण्यासाठी वर-वधू आधीच सुंदर कपडे घेतात आणि तयारी सुरू करतात.
मुलगा आणि मुलीगी दोघांचा कल लग्नात आकर्षक आणि सुंदर दिसण्याकडे असतो. पण तुम्हाला माहिती आहे का? एका देशामध्ये लग्नाच्या अशा पद्धती आहेत ज्यामध्ये भावी वर -वधूच्या तोंडाला काळं फासून गावात फिरवले जाते. जाणून घ्या कोणत्या देशात आहे ही परंपरा आणि असे का केले जाते?
स्कॉटलंडमध्ये ‘ब्लॅकनिंग द ब्राइड’ किंवा ‘ब्लॅकनिंग द ग्रूम’ नावाची एक अनोखी परंपरा आहे. या प्रथेनुसार, लग्नाच्या काही दिवस आधी वर आणि वधू यांच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर काळ्या रंगाचे मिश्रण फासले जाते. केवळ काळा रंगच नाही तर त्यांच्यावर सडलेली अंडे, नासलेले दूध, जुने सॉस, कोळशाची पावडर, पक्ष्यांचे पंख, किचकट पदार्थ, जूनी बूट पॉलिश, तसेच घाणेरडे आणि उग्र वासाचे पदार्थ टाकले जातात.
ही परंपरा जुनी असून लोकांच्या मते अशा प्रकारे वर-वधूला काळे केले की त्यांच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होते. स्कॉटिश लोकांचा विश्वास आहे की, यामुळे वाईट शक्ती आणि दुष्ट आत्मा त्यांच्यापासून दूर जातात. तसेच, या कठीण प्रसंगाला सामोरे गेल्यानंतर नवरा-नवरीला पुढील आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोप्या वाटतात.
या परंपरेसाठी मित्र-परिवार आणि नातेवाईक आधीपासूनच तयारी करतात. भावी वर वधूला न सांगता अचानक पकडले जाते आणि त्यांच्या अंगावर विविध घाणेरडे पदार्थ टाकले जातात. त्यानंतर त्यांना गावभर किंवा शहरभर फिरवले जाते. कधी कधी त्यांना एखाद्या उंच गाडीत बसवून मिरवणूक काढली जाते. हा प्रकार मोठ्या जल्लोषात आणि हसत-खेळत पार पाडला जातो.
हे ही वाचा: महिला पर्यटकांसाठी जगातील 10 सर्वात असुरक्षित देश, जाण्यापूर्वी एकदा विचार करा
होय, स्कॉटलंडमधील काही भागांमध्ये ही परंपरा अजूनही प्रचलित आहे. मात्र, पूर्वीच्या तुलनेत आता ती कमी प्रमाणात केली जाते. काही ठिकाणी या परंपरेत आधुनिक बदल करून फक्त साध्या वस्तूंचा वापर केला जातो. काही लोक याला जुनाट समजून विरोधही करतात, पण आजही स्कॉटलंडच्या ग्रामीण भागात ही परंपरा मोठ्या आनंदाने साजरी केली जाते.
ही प्रथा जरी विचित्र वाटली तरी तिच्यामागे एक विशिष्ट हेतू आहे. नवरा-बायकोने पुढील आयुष्यात कोणत्याही कठीण प्रसंगांना तोंड देण्याची तयारी असावी, हा या परंपरेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे स्कॉटलंडमध्ये या विवाह परंपरेला खास महत्त्व आहे आणि ती आजही काही ठिकाणी टिकून आहे.