CDSCO Drugs List: केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था म्हणजेच सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) आपल्या मासिक सर्वेक्षणामध्ये 49 औषधे निकृष्ट दर्जाची आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी चार औषधे ही बोगस म्हणजेच परिणाम न करणारी असल्याचं निष्पण्ण झालं आहे. 'सीडीएससीओ'ने या 49 औषधांची यादीच जारी केली आहे. या यादीमध्ये आपल्यापैकी अनेकजण दैनंदिन वापरातील अनेक औषधांचा समावेश आहे. उदाहरणार्थ मधुमेहासाठी वापरली जाणारी मेटफॉर्मिन, अॅसिडीटीवर वापरली जाणारी पँटोप्रोजल आणि तापासासाठी वापरली जाणारी पॅरासिटॅमोलचाही समावेश आहे. याशिवाय 'सीडीएससीओ' कॅल्शियम सप्लीमेंट शेल्कल 500 आणि अँटासीड असलेली पॅन डीसहीत चार औषधे बनावट असल्याचं म्हटलं आहे.
भारताचे औषध महानियंत्रक असलेल्या डॉक्टर राजीव सिंह रघुवंशी यांनी यापैकी कोणतंही औषध दूषित नाही. मात्र ही औषधं आखून दिलेल्या प्रमाणात नाहीत. त्यामुळेच त्यांना निकृष्ट दर्जा देण्यात आला आहे. आखून दिलेल्या मापदंडांमध्ये ही औषध बसत नाहीत. यातील काही औषधं बनावट असल्याचं आढळून आलं आहे. या औषधांच्या पाकिटांवर ज्या कंपन्यांची नावं लिहिण्यात आली आहेत त्या कंपन्यांनी ही औषधं बनवलेलीच नाहीत असं तपासात आढळून आलं आहे. दर महिन्याला जवळपास 3 हजार औषधांचे नमुने सतापले जातात. त्यापैकी 40 ते 50 नमुने नकली किंवा निकृष्ट आढळून येतात.
सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) तपासणीमध्ये अपात्र ठरलेल्या औषधांचे तीन प्रकार असतात. यामध्ये खोटी औषधं, एनएसक्यू औषधे आणि भेसळ असलेली औषधे असे प्रकार असतात.
लोकप्रिय ब्रॅण्डची औषधांची नक्कल करुन ती बाजारपेठेत विकली जातात. ही औषधं वापरणाऱ्यांवर कधी त्याचा परिणाम होतो तर कधी नाही. उदाहर्णार्थ ग्लेनमार्कच्या टेल्मिसर्टन (रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरलं जातं) तसेच सनफार्माची पँटोप्रोजलची निर्मिती मूळ कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेली नसल्याचं आढळून आलं.
एनएसक्यू औषधं म्हणजेच नॉट ऑफ स्टॅण्डर्ड क्वॉलिटी प्रकारची औषधं पाण्यात विरघळण्यासंदर्भात निकृष्ट दर्जाची असतात. ही औषधं घेणाऱ्या व्यक्तीवर त्याचा अपायकारक परिणाम होत नाही. मात्र ही औषधं सेवन केल्याने आराम मिळत नाही. त्यामुळे ती घेण्याचा हेतूच साध्य होत नाही.
भेसळयुक्त औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केलेली असते. अशी औषधं घेतल्याने काही सकारात्मक परिणाम तर होत नाहीच उलट त्याने नुकसानच होतं.
अशा औषधांचं तुम्ही सेवन करत असाल तर तातडीने तुम्ही ते थांबवायला हवं. सीडीएससीओने त्यांच्या यादीत समावेश केलेल्या औषधांचा वापर टाळता येईल.
> Tamsulosin and Dutasteride Tablets (UrimaxD)
> Calcium and Vitamin D3 Tablets I.P (SHELCAL 500)
> Pantoprazole Gastro-Resistant and Domperidone ProlongedRelease Capsules I.P. (PAN-D)
> Nandrolone Decanoate Injection IP 25mg/ml (DecaDurabolin 25 Inj.)
> Neurotem-NT
> Cefuroxime Axetil Tablets IP 500 mg (JKMSCL Supply)
> Loperamide Hydrochloride Tablets IP (JKMSCL Hospital Supply)
> Floxages-OZ (Ofloxacin and Ornidazole Tablets IP)
> Wintel 40 Tablets
> Moxica -250 [Amoxicillin Dispersible Tablets IP 250 mg]
> Frusemide Injection IP 20 mg
> Cloxacillin Sodium Capsules IP 250 mg
> Fluorometholone Eye Drops IP
> Panlib 40 Tablets
> B - Cidal 625
> Trypsin, Bromelain & Rutoside Trihydrate Tablets [Flavoshine]
> C Mont LC Kid 60 ml (Montelukast & Leveocetirizine Dihydrochloride syrup)
> Yogaraja Guggulu Tablet
> Telmisartan Tab IP 40 mg
> Pantoprazole Inj. BP 40 mg
> Glimepiride Tab IP
> Cough Syrup