काहीही झालं तरी जोडीदाराला कधीच सांगू नका 'ही' 5 सिक्रेट्स; अन्यथा होईल पश्चाताप

Relationship Tips In Marathi Secret To Keep From Partner : आपल्या जोडीदाराला सर्व गोष्टी सांगाव्यात असं म्हटलं जातं. मात्र दरवेळेस हे योग्य असू शकत असं नाही. त्यामुळेच काही गोष्टी आपल्यापर्यंतच ठेवणं फायद्याचं ठरु शकतं. अशा 5 गोष्टी कोणत्या जाणून घेऊयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 17, 2023, 09:10 PM IST
काहीही झालं तरी जोडीदाराला कधीच सांगू नका 'ही' 5 सिक्रेट्स; अन्यथा होईल पश्चाताप title=
नात्यांमध्ये काही गोष्टी गुपित ठेवलेल्याच चांगल्या (फोटो - पॉवर ऑफ पॉझिटीव्हीटीवरुन साभार)

Relationship Tips In Marathi Secret To Keep From Partner : नातं सुदृढ आणि मजबूत ठेवण्यासाठी विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दल असणारा आदर तसेच एकमेकांवर विश्वास ठेवणं या गोष्टी आवश्यक असतात. खरं तर या गोष्टी कोणत्याही भक्कम नात्याचा पाया असतात. यापैकी एक जरी गोष्ट नसेल तर नात्यामध्ये कटूता निर्माण होते आणि नातं तुटू शकतं. नात्यातील ओलावा संपण्यासाठी याच गोष्टी कारणीभूत ठरतात. अनेकजण आपल्या जोडीदारापासून आपण काहीच लपवू नये असं सांगतात. आपल्या जोडीदाराबरोबर सर्व गोष्टी शेअर कराव्यात असं बरेच लोक म्हणतात. असं केलं नाही तर नात्यात अंतर निर्माण होतं असं सांगितलं जातं. अर्थात गोष्टी लपवल्याने नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. मात्र ही बाबही तितकी 100 टक्के मान्य करता येणार नाही की सगळं एकमेकांना सांगितल्याने नातं टिकून राहील. काही गोष्टी खरोखरच आपल्यापर्यंत मर्यादित ठेवाव्यात असा सल्ला रिलेशनशीप काऊन्सलर्सकडूनही दिला जातो. काही गोष्टी या गुपितचं ठेवल्या पाहिजेत. या गोष्टी आपल्या जोडीदारालाही सांगता कामा नये. असं झालं तर जोडीदाराचा इगो दुखावला जाऊ शकतो. जोडीदाराला वाईट वाटू शकतं. अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या जोडीदाराला सांगणं टाळता येईल ते पाहूयात...

भूतकाळातील आपल्या नात्यांबद्दल सांगू नका

तुमचं वैवाहिक आयुष्य सुखासमाधानाने सुरु असेल आणि लग्नाही काही वर्ष उलटून गेली असली तरी महिलांनी कधीच आपल्या आधीच्या प्रियकाराचा उल्लेख नवऱ्या समोर करु नये. ज्या गोष्टी भूतकाळात घडून गेल्या आहेत त्याबद्दल मस्करीत बोललं तरी जोडीदाराला वाईट वाटू शकतं. खास करुन पुरुष आपल्या पत्नी किंवा प्रेयसीच्या आधीच्या रिलेशनशिपबद्दल समजल्यानंतर नाराज होतात. अनेकांना ही गोष्ट पटत नाही. त्यामुळेच नातं बळकट ठेवण्यासाठी आपल्या आधीच्या नात्याबद्दल बोलू नका.

कुटुंबातील सदस्यांबद्दल वाईट बोलू नका

तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबियांपैकी एखाद्या व्यक्तीचा व्यवहार आवडला नाही तर त्याबद्दल जोडीदाराकडे थेट बोलू नका. जोडीदाराच्या कुटुंबियांची मस्करी त्याच्यासमोर करु नका. अशा गोष्टी आपल्या मनातच ठेवलेल्या बऱ्या. या गोष्टींमुळे जोडीदाराला वाईट वाटू शकते. तुम्हाला कुटुंबाची किंमत नाही असं जोडीदाराला वाटू शकतं. खास करुन सासू-सासऱ्यांबद्दल बोलताना काळजी घेणं फायद्याचं ठरतं. एकमेकांच्या पालकांचा आदर करा.

जोडीदाराबद्दल वाईट बोलू नका

प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसते. आपल्या सर्वांमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात. प्रत्येकात काही चांगल्या वाईट गोष्टी असतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एखादी गोष्ट आवडली नाही तर वारंवार त्याच गोष्टी बोलून त्याची मस्करी करु नका. आपल्या जोडीदाराच्या कमतरता अनेकदा ऐकवल्या तर त्याला वाईट वाटू शकतं. यामुळे जोडीदाराच्या आत्मविश्वाला आणि ईगोला धक्का लागू शकतो.

तुमच्या पूर्वीच्या पार्टनरचं कौतुक करु नका

तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या पूर्वाश्रमीच्या जोडीदाराचं म्हणजेच तुमच्या एक्स बॉयफ्रेण्ड किंवा गर्लफ्रेण्डचं सतत कौतुक करणं टाळा. तुमचं ब्रेकअप झालं असेल तर तुमच्या सध्याच्या जोडीदारासमोर आधीच्या जोडीदाराबद्दल वारंवार बोलणं चुकीचं आहे. यामुळे तुमचा जोडीदार दुखावला जाऊ शकतो. असा वारंवार आपल्या एक्सचा आपल्या सध्याच्या जोडीदारासमोर उल्लेख केल्यास आपण अजूनही त्याच्या प्रेमात आहोत असं जोडीदाराला वाटू शकतं. सध्याच्या नात्याने तुम्ही समाधानी नाही असा तुमच्या जोडीदाराचा समज होऊ शकतो.

आपल्या जोडीदाराच्या मित्रमैत्रिणींबद्दलचे गैरसमज

तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीणीला तुमचा जोडीदार किंवा प्रियकर अथवा प्रेयसी आवडत नसेल. त्यांना तुमच्या जोडीदारामधील एखादी गोष्ट खटकत असेल. पण अशा गोष्टीही तुम्ही तुमच्या जोडीदाराला थेट सांगता कामा नये. या गोष्टीही आपल्यापर्यंत ठेवणं फायद्याचं ठरतं. असं थेट जोडीदाराला सांगितल्यास त्याला वाईट वाटू शकतं.