स्ट्रेसची अनेकदा मीठासोबत तुलना केली जाते. कारण मीठ जसे आहारात कमी प्रमाणात का होईना आवश्यक आहे. अगदी तसेच ताण-तणावाचे आहे. तुमचं ध्येय गाठण्यासाठी थोडा स्ट्रेस तुम्हाला मदत करु शकते तसेच अलर्ट देखील ठेवू शकते. पण जर त्याचे प्रमाण थोडे जरी वाढले तर त्याचा शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. स्ट्रेसचा परिणाम माणसाच्या मानसिक आरोग्यावर, उदासिनता निर्माण करण्यावर, ताण-तणाव वाढवण्यास मदत करते.
कामाच्या ठिकाणी असलेला ताण-तणाव कसा मॅनेज करावा हा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी दिल्या 5 टिप्स.
ताण-तणाव हा दिनक्रमातील हा एक भाग आहे. गुरुदेव श्री श्री रवी शंकर यांनी सांगितल्यानुसार शरीर आणि मन एकाचवेळी हेल्दी राहणं शरीरासाठी महत्त्वाचं आहे. अशावेळी आराम करा आणि पुन्हा उत्साही व्हा असा सल्ला दिला आहे. याकरिता मेडिटेशन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. दररोज 20 मिनिटे मेडिटेशन केल्यावर शरीरावर सर्वात चांगला परिणाम होतो.
श्री श्री रविशंकर यांच्यामते,'तुम्ही जे खात त्याप्रमाणे तुम्ही असता.' त्यामुळे तुमच्या खाण्याकडे विशेष लक्ष द्या. त्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम चांगले राहण्यासाठी छोटे मिल घ्या. एका दिवसातून पाच ते सहा छोटे छोटे मिल घ्यावे. तसेच क्रेविंग झाल्यावर न खात भूक लागल्यावर खाण्याची सवय लावून ठेवा.
आपल्यापैकी अनेकांची कामाची शैली ही बैठी झाली आहे. तासन् तास एकाच जागेवर बसून मिटिंग अटेंड करणे किंवा काम करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. असं असताना कामातून छोटा ब्रेक घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशावेळी श्री श्री रविशंकर म्हणतात की, 2-2 तासांनी छोटा ब्रेक घेणे गरजेचे आहे. यामुळे पायातील सर्क्युलेशन सुधारते म्हणून या ब्रेकमध्ये चालणे महत्त्वाचे आहे. 45 मिनिटांनी कम्प्युटर स्क्रिन समोरून ब्रेक घ्या
अनेकदा कामाचा ताण आल्यामुळे त्याचे प्रेशर वाढते. अशावेळी कामाचे नियोजन हा पर्याय सर्वोत्तम ठरू शकतो. श्री श्री रविशंकर म्हणतात की, वर्क स्ट्रेस मॅनेज करणे महत्त्वाचे असते. अशावेळी तुमचं प्लानिंग आणि महत्त्वाच्या कामांची वर्गवारी करणे आवश्यक आहे.
खासगी आयुष्य आणि कामातील ताण यामध्ये सुवर्णमध्य साधणे अत्यंत गरजेचे आहे. कामाचा ताण येऊ नये असे वाटत असेल तर हा मेळ घालणे अत्यंत गरजेचे असते. कामाचा ताण आणि गोष्टी घरी नेऊ नये तर घरच्या गोष्टी ऑफिसमध्ये आणू नयेत. यामुळे तुम्ही आनंदी राहू शकता.