Navaratri 2024: नवरात्रीमध्ये धान्य पेरण्याचा योग्य मार्ग माहितेय? 'ही' आयडिया करा फॉलो, १ दिवसात फुटू लागतील अंकुर

Fast Sprouting: नवरात्रीच्या पवित्र सणाला उद्यापासून सुरुवात होत आहे. या सणामध्ये घरात धान्याची पेरणी करून नऊ दिवस गवत वाढवले जाते. 

Updated: Oct 2, 2024, 02:51 PM IST
Navaratri 2024: नवरात्रीमध्ये धान्य पेरण्याचा योग्य मार्ग माहितेय? 'ही' आयडिया करा फॉलो, १ दिवसात फुटू लागतील अंकुर title=

Navratri 2024: नऊ दिवसाच्या उत्साहपूर्व सणाला गुरुवारपासून (३ ऑक्टोबर) सुरु होत आहे. नऊ रंग, गरबा, दांडिया आणि देवीची मनोभावे सेवा अशा पद्धतीने या सण साजरा केला जातो. या काळात अनेक घरांमध्ये देवीच्या समोर कलशाची स्थापना केली जाते. कलश किंवा टोपलीमध्ये धान्य पेरलं जातं. या काळात अशाप्रकारे प्रेरणी करणे फार शुभ मानले जाते. याला घरातील सुख-समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते. पेरलेल्या शांचे गवत जेवढे लांब आणि हिरवे तेवढा आनंद घरात येतो अशी मान्यता आहे. अनेकांकडे गहू किंवा ज्वारीची पेरणी केली जाते. पण काहींचे रोप जास्त छान वाढत नाही. पण यंदा असं होणार नाही कारण  आम्ही तुमच्यासाठी सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत. यामुळे तुमचे धान्याचे गवत दाट, लांब आणि छान हिरवेगार येईल. चला काय टिप्स आहेत ते जाणून घेऊयात... 

नवरात्रात गहू आणि ज्वारी पेरण्याची पद्धत

>  सगळ्यात आधी धान्य पेरण्यासाठी मातीचे भांडे घ्या. मातीचे भांडे छान पाण्याने धुवून घ्या.  
> धान्य पेरणीपूर्वी एक दिवस रात्री पाण्यात भिजवा. असे केल्याने, अंकुर लवकर निघतात आणि धान्य छान वाढतीलही. रात्री भिजवलेल्या धान्यातून सकाळी पाण्याच्या वर आलेल्या बिया काढून टाका.  अशा बियाणं अंकुर फुटणार नाही.
> आता पेरण्यासाठी तयार केलेलं भांड घ्या आणि त्यात चांगल्या दर्जाची माती घाला. वरून घालण्यासाठी थोडी माती बाजूला काढून ठेवा. 
> मातीमध्ये भिजवलेले धान्य छान पसरवून टाका. त्यावरून  कोरड्या मातीचा हलका थर पसरवा. वर जास्त माती टाकायची गरज नाही. फक्त पेरलेले धान्य झाकून जाईल एवढी माती वरून घाला. 

हे ही वाचा: Navratri 2024: नवरात्रीचा उपवास करणार आहात? आधीच बनवून ठेवा उपवासाची भेळ, नोट करा Recipe

> पाण्याची स्प्रे बाटली घ्या आणि माती ओली होईपर्यंत हलकेच पाणी फवारा. लक्षात घ्या की तुम्ही स्प्रेशिवाय पाणी टाकत असाल तर तुम्हाला हाताने छान पाणी सर्वत्र शिंपडावे लागेल. एकाच वेळी एकाच ठिकाणी जास्त पाणी ओतणे टाळा. यामुळे धान्य इकडे तिकडे होऊ शकते. 
> आता या भांड्याला एका प्लेटने झाकून बाजूला ठेवा. वरची माती सुकायला लागल्यावर पुन्हा पाणी फवारा. पण लक्षात ठेवा उगाचच जास्त पाणी घालू नका.
> अंकुर दिसेपर्यंत तुम्हाला हे भांडे झाकून ठेवावे लागेल.
> जेव्हा अंकुर वाढतात तेव्हा हे भांडे उघडा. 
> आता सकाळ संध्याकाळ पाण्याची फवारणी करत रहा. त्यामुळे धन्याची रोपे चांगली वाढू लागतील. 
> हे लक्षात ठेवा की, तुम्हाला माती सुकल्यावरच पाण्याची फवारणी करायची आहे. अशा प्रकारे, गवत ५-६ दिवसात पूर्णपणे हिरवे होईल आणि उंच होईल.