Mini Thailand: मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. याशिवाय मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे महानगर देखील आहे. मुंबईत काही नाही असं नाहीच. राजकीय ते मनोरंजन क्षेत्र सगळ्याचं साठी मुंबई प्रसिद्ध आहे. हे शहर जितके ग्लॅमरसाठी प्रसिद्ध आहे तितकेच येथील समुद्रकिनारे आणि बेटेही तितकेच लोकप्रिय आहेत. मुंबईत आणि मुंबईच्या जवळ असलेल्या अनेक ठिकाणी जिथे फिरायला जातात. इथे अनेक बीचेस प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की मुंबईच्या जवळच मिनी थायलंड (Devbagh Maharashtra) आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रात थायलंडचा फील घ्यायचा असेल तर तुम्ही जर या जागेला नक्कीच भेट द्या. सुट्टीत महाराष्ट्रात फिरण्याचा विचार करत असाल तर यावेळी हे आयलंड पाहायला विसरू नका.
मुंबईजवळील मिनी थायलंड म्हणजे सीगल आयलंड (Seagull island devbag). हे बेट मुंबईतील देवबाग स्थळाच्या दरम्यान समुद्रात आहे. निसर्ग आणि अॅडव्हेंचर आवडत असलेल्या लोकांसाठी हे स्वर्गापेक्षा कमी नाही. निसर्गाची आवड असलेले लोक येथे भेटायला येतात. हे मुंबई नजीकचे ऑफबीट डेस्टिनेशन आहे. चला आज आम्ही तुम्हाला या बेटाची खासियत सांगणार आहोत.
हे बेट इतर बेटांपेक्षा थोडे वेगळे आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे ते दिवसातून फक्त 30 मिनिटेच उघडते. देवबाग बीचच्या टोकापासून तुम्ही या बेटावर चालत जाऊ शकता. त्याची पाण्याची पातळी कमाल ३ फूट आहे.
या बेटावर जायचे असेल तर बोटीची मदत घ्यावी लागेल. येथे जाण्यासाठी बोटीचे 500-800 रुपये मोजावे लागतात. तथापि, येथे आपण थोडीशी बार्गेनिंग करू शकता.
हे ही वाचा: Hindu Ritual: महिलांनी नारळ का फोडू नये? याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
Witness the charm of nature at Sangam Seagull island at Devbag Beach. Located in the Sindhudurg district, this island is the perfect place to spot seagulls in their true form and enjoy the magnificent beauty of Konkan.
Visit now and make worthwhile memories! pic.twitter.com/GNl4zOfgeB
— Maharashtra Tourism (@maha_tourism) March 28, 2024
हे बेट खूपच लहान पण सुंदर आहे. पाहिल्यास कोणत्याही गावापेक्षा ते खूपच लहान आहे. हे स्वच्छ निळे पाणी आणि सभोवतालच्या समुद्राच्या बाजूंसाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे येऊन सूर्यस्नान करू शकता आणि मासेमारी सारख्या अनेक अॅक्टिव्हिटीमध्ये देखील सहभागी होऊ शकता.
हे ही वाचा: भारताचा सर्वात फ्लॉप हिरो! 13 वर्षात दिले 11 फ्लॉप चित्रपट, आता करतायेत करोडोंची कमाई
या बेटाचे नाव सीगल असण्यामागे एक कारण आहे. येथे तुम्हाला अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतील. पण हे बेट सीगल्ससारख्या विदेशी पक्ष्यांचे घर आहे. त्यामुळे या बेटाला सीगल म्हणतात. या शिवाय याची ओळख मिनी थायलंड असं आहे.