अंधारात काढलेल्या फोटोमध्ये डोळे लाल का दिसतात? दुर्लक्ष करु नका, असू शकतो 'हा' आजार

Red Eye In Photographs : तुम्हाला कधी विचार आलाय का? रात्रीच्या वेळी किंवा अंधारात फोटो काढल्यानंतर डोळे लाल दिसतात. विज्ञानाच्या अहवालानुसार अंधारात डोळे लाल दिसणे म्हणजे एक प्रकारचा आजार असू शकतो. जाणून घ्या सविस्तर बातमी... 

Updated: Feb 21, 2024, 04:22 PM IST
अंधारात काढलेल्या फोटोमध्ये डोळे लाल का दिसतात? दुर्लक्ष करु नका, असू शकतो 'हा' आजार  title=

Red Eye In Photographs in Marathi : आजकाल स्मार्टफोन एकप्रकारचं व्यसन होत चाललंय. स्मार्टफोनमधील विविध ॲप्लिकेशन्सद्वारे लोकांना जोडत राहतो. स्मार्टफोनचा वापर हा जास्तीच जास्त फोटो काढण्यासाठी केला जातो. हल्ली फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी स्मार्टफोन हे सर्वात मोठे साधन बनले आहे. परंतु, अनेकदा किंवा स्मार्टफोनमधील काही त्रुटींमुळे फोटो चांगले येत नाहीत किंवा फोटोमुळे तुमच्यामध्ये काही बदल दिसतात. ही समस्या केवळ स्मार्टफोनच्या फोटोंमध्ये आढळत नाही तर अनेक कॅमेऱ्यांमध्ये काढलेला फोटोमध्ये आपल्या डोळ्यांचा काही भाग लाल रंगाचा दिसतो. थोडक्यात काय तर अंधारात किंवा रात्रीच्या वेळी कॅमेऱ्यात फोटो काढले तर डोळे लाल दिसतात. याचा तुम्ही कधी विचार केलाय का? 

अंधारात काढलेल्या फोटोमध्ये तुमचे डोळे लाल येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. अनेकदा कॅमेरामध्ये टिपलेला फोटोमध्ये डोळे लाल दिसले तर सामान्य गोष्ट बोलून दुर्लक्षित केले जाते. पण हा एकप्रकारचा आजार असू शकतो.  फोटोंमध्ये डोळे लाल होण्याचे मुख्य कारण म्हणजे रात्री फ्लॅश लाइटमध्ये फोटो काढणे. डोळ्यांच्या बुबुळावर पडणाऱ्या प्रकाशांमुळे असं होतं. डोळ्यांच्या रेटिनावर  पडणारा प्रकाश जितका तीव्र असेल तितके डोळे लाल दिसण्याची शक्यता जास्त असते. सायन्स एबीसीच्या रिपोर्टनुसार, रात्रीच्या वेळी प्रखर फ्लॅश लाइटचे परिणाम डोळ्यांवर दिसतात. रेटिना जेव्हा डोळ्यांवर येणाऱ्या प्रखर फ्लॅशलाईटल  रिफ्लेक्ट म्हणजेच परावर्तित करतो. तेव्हा त्या भागातील रक्तवाहिन्यांमुळे डोळ्यांचा वरचा भाग लाल रंगाचा दिसतो आणि हेच रिफ्लेक्शनही कॅमेऱ्यात दिसून येते.

काही फोटोंमध्ये डोळ्यांचा रंग गडद दिसतो. काही फोटोंमध्ये तो फिकट लाल दिसतो. मात्र, शास्त्रज्ञांनी त्यांच्या अहवालात त्याची कारणे सांगितली आहेत. अहवालानुसार, डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या या लाल रंगाची तीव्रता रेटिनाच्या थरात असलेल्या मेलॅनिनच्या प्रमाणावर अवलंबून असते. गोरी त्वचा असलेल्या लोकांमध्ये डोळ्यांचा लाल रंग जास्त गडद दिसतो. तर गडद त्वचेच्या लोकांमध्ये लाल रंग डोळ्यात फिकट लाल दिसतो. 

कॅमेऱ्यात लाल रंगाचे डोळे दिसू लागल्याने तुमचे अनेक फोटो खराब होता. अनेकदा तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या क्षणांचे फोटो पाहून तुम्हाला ते मोलाचे वाटत नाही. केवळ ऑल अबाउट व्हिजन किंवा वेबसाइटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, फोटो काढताना कॅमेऱ्यापासून थोडे अंतर उभे राहून किंवा थेट कॅमेऱ्याकडे न पाहता समस्या कमी करता येतात. फोटोंमध्ये डोळे लाल दिसण्यासाठी बाह्य फ्लॅश वापरणे आणि फोटो ज्या भागात घ्यायचा आहे त्या ठिकाणी जास्त प्रकाश वापरणे फोटोमधील लाल डोळे दिसणे कमी करू शकते.