Tata For Good Bye : आपण अनेक जण लहानपासून जेव्हा आपण कुठे जातो तेव्हा कुणाला तरी पाय म्हणताना Tata असं म्हणतो. अनेक वेळा हा Tata शब्द आपल्या कानी पडला आहे. खास करुन भारतीय लोक Tata या शब्दाचा उपयोग करतात. पण हा शब्द कुठून आला गूड बाय ऐवजी आपण टाटा का म्हणतो. या शब्दाचा नेमका अर्थ तरी काय याचा तुम्ही कधी विचार केला का? निरोप घेताना किंवा देताना 'टा-टा' का म्हणतात? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या 'टा-टा' चा संबंध हा स्तनाशी जोडलेला आहे. मग तरीही आपण हा एवढा सर्रास आणि खास करुन मुलांसोबत का वापतो. (Why do we say TA TA for good bye What does it mean and what does it have to do with breasts) य
Ta-ta हा शब्द भारतीय वापरत असले तरी हा इंग्रजीमध्ये वापरला जाणारा शब्द आहे, हे जाणून तुम्ही अवाक् झाला ना. बर्याच शब्दकोशांमध्ये असं म्हटलं आहे की ब्रिटीश इंग्रजीनुसार टा-टा शब्दाचा अर्थ अलविदा असा होतो. जेव्हा कोणी कोणाला अलविदा म्हणतो किंवा वेगळे होतो तेव्हा त्याला अलविदा म्हटलं जातं. त्यासाठी टा-टा हा शब्द वापरला गेला आहे.
हा शब्द 1823 साली इंग्रजीत आढळून आला होता. न्यूयॉर्क टाइम्सने 1889 मध्ये तो फेअरफेल शब्द म्हणून वापरण्यास सुरुवात केली. पण, हा शब्द 1940 मध्ये खूप लोकप्रिय व्हायला लागला. खरंतर, त्यावेळी TTFN साठी Ta-Ta हा शब्द वापरला गेला होता. जर आपण TTF चे पूर्ण रूप बघितलं तर त्याचा अर्थ Ta-Ta for Now असा होतो. हा शब्द त्या काळातील प्रसिद्ध रेडिओ कार्यक्रमांमध्ये वापरला जात होता आणि तो अतिशय सामान्य झाला होता. मग पुन्हा टा-टा चांगल्या मुलासाठी हा शब्द वापरला जाऊ लागला.
Ta-ta म्हणजे अलविदा असं अर्थ होतो. मग टाटा आणि स्तन याचा कसा संबंध असू शकतो. स्तन आणि टा-टा यांच्यातील संबंधाबद्दल काही तथ्य समोर आले आहेत. त्यानुसार अनेक अमेरिकन शब्दकोशांमध्ये हा शब्द स्तन म्हणून वापरला गेल्याचं समोर आलं आहे. हे स्त्रियांच्या स्तनांचा संदर्भ म्हणून वापरला गेला आहे.