जिल्हा सामान्य रूग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू

नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात लागली आग

Updated: Jan 9, 2021, 08:43 AM IST
जिल्हा सामान्य रूग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू  title=

भंडारा : राज्याला हादरवणारी घटना भंडाऱ्यात घडली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात आग लागली. या आगीतून ७ बालकांना वाचवण्यात आलं आहे. पण १० बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री २ वाजता ही आग लागली. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आऊटबोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं समोर आलं. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नर्सने दरवाजा उघडून पाहिला असता खोलीत मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. 

अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं. या आगीत आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेली सात बालकं वाचवण्यात आली. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० बालकांचा मृत्यू झाला.

भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. राज्यमंत्र्यांना तातडीने भंडाऱ्यात जाण्याचे आदेश राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोणत्याही हलगर्जीपणावर कठोर कारवाई होईल असं आरोग्यमंत्र्यांनी झी२४तासशी बोलताना म्हटलं आहे.