आज जाहीर होणार दहावीचा निकाल

ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होणार निकाल   

Updated: Jul 29, 2020, 07:06 AM IST
आज जाहीर होणार दहावीचा निकाल  title=

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं लांबणीवर पडलेल्या इयत्ता दहावीच्या निकालांचा दिवस अखेर उजाडला आहे. आज, म्हणजेच बुधवार २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीनं हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

कोरोना संकटामुळं भुगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला होता. ज्यानंतर आता उर्वरित विषयांची सरासरी काढत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बऱ्याच प्रतिक्षेनंतर निकालांची तारीख जाहीर करण्यात आल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांचं संपूर्ण लक्ष हे अर्थातच या निकालाकडे लागलं आहे. 

दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत, तर ३० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत छायाप्रतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. 

खालील संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल 

mahresults.nic.in

maharashtraeducation.com

results.mkcl.org

mahahsscboard.maharashtra.gov.in

निकाल पाहण्यासाठी वरील दिलेल्या संकेसंकेतस्थळाला भेट दिल्यानंतर

- Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट या लिंकवर क्लिक करा.
-पुढं तुमचा (अनुक्रमांक) रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.
– तुम्ही या निकालाची प्रिंटही काढू शकता.