नाशिक : नाशिकमध्ये अकरा महिन्यांच्या बाळाचा बादलीत पडून अंत झाल्याची दुखद घडना घडली आहे. बाळ झोपलेलं असताना आई घराबाहेर गेली होती. बाळ अचानक उठून बाथरुमध्ये गेलं आणि त्याचा तोल जाऊन तो बादलीत पडला. यातच त्याचा दुर्देवी अंत झाला.
तन्मय भोये असं अंत झालेल्या या लहान बाळाचं नाव आहे. नाशिकच्या मोरे मळा परिसरताली ही घटना आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.