नागपूर : कामचोर पोलिसांना पोलीस आयुक्तांनी दणका दिला आहे. सतत ड्युटीपासून गैरहजर राहणारे, ड्युटीवर अनियमित असणारे, वारंवार सीकलिव्ह घेऊन गैरहजर राहणाऱ्या १५ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे.
हे कर्मचारी गैरहजर राहात असल्यामुळे त्यांच्या कामाचा भार इतरांवर येत होता. म्हणून अशा दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांचं आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबन केले आहे.
नागपूर : कामचोर पोलिसांना पोलीस आयुक्तांनी दणका दिला । सतत ड्युटीवर गैरहजर राहणाऱ्यांना निलंबित केले आहे । काहीना काही कारणांनी गैरहजर राहणाऱ्या १५ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे@ashish_jadhao https://t.co/kpo9phDaSR pic.twitter.com/XzeDTyJaVh
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 13, 2020
सतत ड्युटीपासून गैरहजर राहणारे, या ड्युटीवर अनियमित असणाऱ्या पोलिसांना जोराचा झटका बसला आहे. हे कर्मचारी सतत अनुपस्थित राहत असल्यामुळे त्यांच्या कामाचा भार दुसऱ्या कर्मचाऱ्यांवर येत होता. म्हणून सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थित राहण्याच्या कारणांचा आढावा आयुक्तांनी घेतला. त्यानंतर आयुक्त अमितेशकुमार यांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान, आतापर्यंत या कर्मचार्यांच्या ड्युटीसंदर्भात कोणीच कशी माहिती घेतली नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी १० ऑक्टोबरला या सर्व कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड तपासले होते. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी काल एका बैठकीकरता १२९ अधिकारी-कर्मचार्यांना पोलीस जिमखान येथे बोलवले होते. तिथेच या गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलखोल झाली. हे १५ कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगत सुट्या घेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अन्य कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढत आहे. या कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कुणाची कृपादृष्टीहोती याबाबत तपास होण्याची शक्यता आहे.