चेतन कोळसे, झी मीडिया नाशिक : देशभरात 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पुण्यातील कोंढवा (Pune Kondhawa) परिसरात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. हे प्रकरण ताजं असतानाच नाशिकमध्ये (Nashik) ही अशीच संतापजनक घटना घडली आहे. नाशिकमध्येही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्या आल्या आहेत. नाशिकच्या चांदवड टोलनाक्यावरील (Chandwad Toll Plaza) कर्मचाऱ्याने पाकिस्तन जिंदाबादच्या घोषणा दिल्या. पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्या कर्मचाऱ्या विरोधात चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी गुन्हा दखल करण्याचे दिले आदेश दिले. शहादाब शौकत कुरेशी असं घोषणा देणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. धार्मिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत त्या कर्मचाऱ्याविरुद्ध 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पुण्यातही अशीच घटना
पुण्यातील कोंढवा परिसरात काल पाकिस्तान जिंदाबादची नारेबाजी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तरुण कोंढवा परिसरात एका बांधकाम सुरु असलेल्या शाळेचे सुरक्षा रक्षक आहेत. सोमवारी रात्री त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्या ठिकाणहून जाणाऱ्या काही नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. यापूर्वी देखील पुण्यात पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी झाल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यात पीएफआयच्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पुण्यात गेल्या महिन्याभरात पाच दशहतवादी अट करण्यात आले आहेत. यातील मुख्य आरोपीला कोंढवा परिसरातूनच अटक करण्यात आली होती.
बुलडाण्यातही तरुणाला अटक
बुलडाण्यातही असाच संतापजनक प्रकार घडला हता. बलढाणा येथे एका तरुणाने proud to be a pakistani अशी पोस्ट सोशल मिडिावर टाकली. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या तरुणाने आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर पाकिस्तानच्या स्वतंत्र दिनाचा उल्लेख करत पाकिस्तानी झेंडे आणि पाकिस्तानी असल्याचा गर्व आहे अशी पोस्ट टाकली होती. . हा तरुण मलकापूर येथील औषधनिर्माण महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. या तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वतंत्र दिन होता. मलकापूर येथील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील मुजम्मिल खान अहमद खान या विद्यार्थ्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर " proud to be a pakistani आणि पाकिस्तानी झेंडे घेऊन पाकिस्तान स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.