बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक वेगळाच अंदाज पहायला मिळाला. त्यांनी विटी दांडू खेळण्याचा आनंद लुटला. पर्यावरण दिनानिमित्त बारामती इथं एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्यावतीनं मातीतल्या खेळांची जत्रा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या जत्रेत अजित पवार यांनी विटी दांडू खेळण्याचा आनंद लुटला. विषेश म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केलं होतं. येत्या तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विटीदांडू, गोट्या, लगोरी, टायर पळविणे, भोवरा. अशा विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवारांनी थेट मैदानात येत विटी दांडू खेळण्याचा आनंद घेतला.