Shivneri Accident: शिवनेरी गडाच्या पायथ्याशी एक धक्कादायक प्रकार घडला. शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. दरम्यान येथे एक विचित्र अपघात घडला. अमोल कोल्हे आणि जयंत पाटील ज्या क्रेनच्या ट्रॉलीवर उभे होते, ती ट्रॉली कलंडली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे थोडक्यात बचावलेयत.शिवस्वराज्या यात्रा सुरू झालीय.यावेळी शिवनेरीच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर क्रेनची ट्रॉली एका बाजूला कलंडली.यावेळी क्रेनच्या ट्रॉलीत जयंत पाटील, अमोल कोल्हे, मेहबुब शेख, रोहिणी खडसे होत्या. चौघेही एका बाजूला कलंडले.सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नसून सर्व जण सुखरुप आहेत.छत्रपती शिवरायांचा पुतळा उंचावर असल्याने क्रेनच्या सहाय्याने हे नेते उंचावर चढले होते. दरम्यान क्रेनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्याची ट्रॉली कलंडली.
आमची यात्रा ही साधी आहे, आमचा कोणता ही इव्हेंट नाही. जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही मांडतोय, त्यासाठी कोणता विशिष्ट रंग देण्याची गरज नाही. त्यामुळं आमच्या यात्रेला जनसामान्यांचा पाठिंबा मिळतोय अशा शब्दात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवर जयंत पाटलांनी टिका केली. ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर तेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील,अशी चर्चा आहे. यावर जयंत पाटलांना विचारण्यात आले. उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन आले ही बाब मविआच्या दृष्टीने चांगली. एकसंध होऊन आम्ही निवडणुका लढणार, एकत्रित सगळे निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटलांनी यावेळी दिली. सत्ता आणून देतो. असं देवेंद्र फडणवीस म्हणतात हा एक दर्प आहे, जो महाराष्ट्राची जनता दूर करेल.मविआचा विधानसभा निवडणुकीचा चेहरा कोण? हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा महायुतीला त्यांचा चेहरा कोण, हा प्रश्न त्यांना विचारा.
अजित पवार गटाचे अतुल बेनके तुमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत,अशी चर्चा आहे. यावर जयंत पाटील म्हणालेस अतुल बेनके आमच्या यात्रेत आले तर त्यांचं स्वागतचआहे. पण मी जुन्नरमध्ये आल्यानंतर ते मला अद्याप भेटले नाहीत. ते आमच्या पक्षात येऊ इच्छितात, असं मी ऐकल्याचे ते म्हणाले.
अमोल मिटकरी आज आमच्या सोबत नाही ही खंत वाटते. अमोल कोल्हे दिल्लीत चांगलं काम करतात मात्र त्यांचा आवाज महाराष्ट्रातील सर्व जनता ऐकतेय. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते. कोल्हेंचे राज्यात नेतृत्व देणार का? यावर जयंत पाटलांनी सुचक विधान केले.