लोकायुक्त कायद्यासाठी आण्णा हजारे यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

 जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी सरकारला लोकायुक्त कायद्यावरून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

Updated: Sep 10, 2021, 02:31 PM IST
लोकायुक्त कायद्यासाठी आण्णा हजारे यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा title=

पारनेर : जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी सरकारला लोकायुक्त कायद्यावरून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 'लोकपाल/लोकायुक्तासाठी कायदा ही भूमिका आम्ही 2011 मध्येच ठरवलेली आहे. त्यामुळे आता पुन्हा आंदोलन करू' असे आण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

आण्णा हजारे यांनी देशातील भ्रष्ट्राचार कमी व्हावा यासाठी जनलोकपाल आंदोलन उभारले होते. 'लोकायुक्त साठी मी 3 आंदोलन केली आता या कायद्यासाठी चौथ आंदोलन करू' असे म्हणत आण्णा हजारे यांनी पुन्हा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लोकायुक्ताकडे वैधानिक शक्ती आहे. त्यामुळे भ्रष्ट मंत्री घरी जातील. त्यामुळे हे सरकार घाबरत आहे. सरकार मोर्चा आंदोलनाला नाही तर पडण्याला घाबरते. अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणार आहे. असंही आण्णा यांनी म्हटले.

वेळ पडली तर जेलभरो..
लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलन करणार आहोत. वेळ पडली तर जेलभरो आंदोलनही करू तसेच, भाजप सरकार असलेल्या राज्यात लोकायुक्त कायदा करून नेमणूक करावी. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील पत्र लिहणार असल्याचे आण्णांनी सांगितले आहे.

देशातील भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. हीच भावना सगळ्यांची असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.