महाराष्ट्राच्या २८८ जागांवर एवढे उमेदवार रिंगणात

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायचा आजचा शेवटचा दिवस होता.

Updated: Oct 7, 2019, 09:55 PM IST
महाराष्ट्राच्या २८८ जागांवर एवढे उमेदवार रिंगणात title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायचा आजचा शेवटचा दिवस होता. राज्यातल्या २८८ मतदारसंघातून एकूण १,५०० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ४,७३९ वैध उमेदवारांपैकी आता ३,२३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

२१ ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या सगळ्या २८८ जागांवर निवडणूक होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. ९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदार मतदानाचा हक्का बजावणार आहेत.

महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा वापर करण्यात येणार आहे. तर २८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्याची परवानगी नाही, असं निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केलं आहे. विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही २१ तारखेला होणार असून २४ तारखेलाच याचाही निकाल लागणार आहे. उदयनराजे भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक होत आहे.