पुणे : गुरुवारी चाकण उद्योगनगरीतील कुरुळी इथं एका लग्न घरावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. या घटनेत नववधुसह तिचा भाऊ आणि आई गंभीररित्या जखमी झालेत. हा हल्ला दरोड्याच्या हेतुने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. कुरुळी येथील कुंभार भट्टी येथे भरदिवसा बागडे यांच्या घरात घुसून तीन जणांना धारदार हत्याराने मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या हल्लात तीन जण गंभीर जखमी झाले असून तिघांना उपचारासाठी खाजगी रुग्नालयात दाखल करण्यात आहे. घटनेचे गांभीर्य पाहुन चाकण पोलीस घटनास्थळी पोलीस दाखल झाले.
बागडे कुटुंबातील ऐश्वर्या बागडे या मुलीचा ३० एप्रिल विवाह असून व चार दिवस बँकेला सुट्टी असल्याने बागडे कुटुंबाची लग्नाची लगबग सुरु होती. अचानक त्यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये नववधुसह भाऊ वैभव बाळासाहेब बागडे तसंच आई स्वाती बागडे हे गंभीर जखमी झाले आहेत. लग्नाच्या तयारीसाठी सोने दागिन्यांवर पाळत ठेवून हा हल्ला झाल्याचा अंदाज असून हल्ला करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत.
लग्न घरात अनेक दागिन्यांच्या महागड्या वस्तू व पैसे याची पाळत ठेवत हल्लेखोर घरापर्यंत आले व अचानक घरामध्ये प्रवेश केला. बंदूक आणि कोयत्याचा धाक धाखवत घरातील कुटुंबीयांना शांत खाली बसण्यासा त्यांनी सांगितलं. त्यानंतर धारदार हत्यारानं त्यांनी कुटुंबीयांवर हल्ला केला. जखमींवर चाकण येथील साईनाथ हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. चाकण पोलिसांची एक टीम घटनास्थळी असून अज्ञात हल्लेखोरांचा तपास करत आहेत.