भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला

अंबरनाथजवळच्या वांगणीत दोन कुटुंबातलं भांडण सोडवायला गेलेल्या दोन पोलीसांवरच हल्ला करण्यात आला. 

Updated: Jun 26, 2017, 04:49 PM IST

अंबरनाथ : अंबरनाथजवळच्या वांगणीत दोन कुटुंबातलं भांडण सोडवायला गेलेल्या दोन पोलीसांवरच हल्ला करण्यात आला. 

कोयता, चॉपर,हॉकी स्टीकनं झालेल्या या हल्ल्यात कुळगाव पोलीस ठाण्यातले पोलीस उपनिरीक्षक दिलीप गोसावी आणि हवालदार संजय गोरे जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलय.

वांगणीजवळच्या कुडसावरे गावात शंकर पारधी आणि संभाजी पारधी यांच्या कुटुंबात शनिवारी रात्री हाणामारी सुरू होती. त्याची खबर पोलीसांना मिळाली. पोलिसांनी गावात जाऊन भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण अंदाजे १५ जणांच्या टोळ्यानं पोलीसांवरच प्राणघातक हल्ला चढवला. 

यानंतर पोलीसांनी कुळगाव पोलीस ठाण्यात शंकर पारधी, देवीदास शिसवे, रघुनाथ पारधी, अंकुश देशमुख, महेश रोकडे आणि संजय पारधी याच्यासह १० जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आलाय.