औरंगाबाद: पोलीस अधिकाऱ्याला भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या मारहाणी दरम्यान पोलीस अधिका-यांच्या डोळ्याला आणि ओठांना दुखापत झाली आहे. रक्तस्त्राव होत असल्याने पोलीस निरीक्षकाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. किरकोळ वादातून सेंट्रल आर्म पोलिस फोर्सच्या दिल्लीतील एका व्यक्तीनं ही मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद इथे नगर नाका परिसरात भररस्त्यात किरकोळ कारणावरून पोलिसाला मारहाण करणाऱ्यात आली. मारहाण करणारा व्यक्ती दिल्लीच्या सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील आहे.
गाडीत बसलेला असताना मास्क घातला नव्हता म्हणून पोलिसांनी त्याला हटकलं. म्हणून त्यानं आधी कॉन्स्टेबलला मारहाण केली. नंतर त्याला एपीआय भागीले यांच्याकडे नेल्यावर त्यांनाही त्याने मारहाण केली.
रेंजर टू. एनएसजी. सेंट्रल आर्म पोलिस फोर्स दिल्ली इथे काम करणाऱ्या गणेश गोपीनाथ भुमे यांनी पोलिसांना बेदम मारहाण केली. गणेश भुमे हे फुलांब्री इथे सुट्टीवर आले असताना त्यांचा पोलिसांसोबत वाद झाला. हा वाद शिगेला पोहोचला आणि संतापाच्या भरात त्यांनी पोलिसांना मारहाण केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर जखमी झालेल्या पोलीस निरीक्षकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.