विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद: देशात दारूच्या विक्रीत आणि खरेदीत मोठी वाढ होताना दिसते आहे. त्यातून कोविडनंतर (Liquor Stock) तर दारूच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातून आता दारूच्या व्यापारातही मोठी वाढ झाली आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, औंरगाबाद येथे दारूच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या मानानं दारूच्या विक्रीत (Liquor Sells) मोठी वाढ झाली असल्याचे समोरं आले आहे. त्यामुळे या बातमीनं पुन्हा एकदा सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. समोर आलेल्या आकडेवाडीनूसार, 1 हजार कोटींचा फायदा औरंगाबाद येथील कंपन्यांना झाला आहे. नक्की काय आहे पुर्ण प्रकार जाणून घ्या.
औंरगाबादच्या जिल्ह्यात दारूची जबरदस्त विक्री वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. 1 एप्रिल 2022 ते 31 जानेवारी 2023 या दहा महिन्यांतच तब्बल 4 हजार 14 कोटी 87 लाख रुपयांचा महसूल राज्य शासनाला दिला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 1 हजार 84 कोटी रुपये अधिकचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाला (Liquor Business in Aurangabad) प्राप्त झाला आहे. राज्य शासनाने औरंगाबाद विभागाला ठरवून दिलेले महसूलाचे उद्दीष्ट 10 महिन्यांतच 96 टक्के पुर्ण झाले आहे, अशी माहिती अधिक्षक संतोष झगडे यांनी दिली आहे. मागील वर्षी म्हणजेच 2021-22 या वर्षात औ. राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्य सरकारला 3937 कोटी रुपयांचा महसूल दिला होता. त्यातुलनेत या वर्षी दहा महिन्यांत महसूलात 1084 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यात दारू कंपन्यांच्या विक्रीचाही समावेश आहे.
दारूच्या विक्रीत आणि खरेदी लक्षणीय वाझ होत असल्याचा हा पुरावा आहे. त्यामुळे सध्या या बातमीनं व्यापारा क्षेत्रात चर्चांना उधाण आली आहे. सध्या दारूचे व्यसन हे अनेकांना आहे. घरोघरीही दारूची खरेदी केली जाते. त्यामुळे सगळीकडेच या एका बातमीनं खळबळ माजवली आहे. मुंबई शहरातही मोठ्या प्रमाणात दारू विकली आणि खरेदी केली जाते.