भिवंडी : भिवंडीत इमारत कोसळल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 33 वर गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 15 लहान बालकांचा समावेश आहे. तर आतापर्यंत एकूण 25 जणांना ढिगाऱ्याकडून बाहेर काढण्यात यश आलं आहे. या सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या लोकांना भिवंडी आणि ठाण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रभर मदतकार्य सुरु आहे. 43 वर्ष जुनी जिलानी इमारत सोमवारी कोसळली. इमारतीमध्ये 40 फ्लॅट होते आणि जवळपास 150 लोक येथे राहत होते. इमारत दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसंच इमारतीच्या मालकाविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. अद्यापही एनडीआरएफ आणि टीडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे.
दरम्यान, अनधिकृत इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दंड आकारणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.