मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वसई पूर्व 360 एकर भूखंडावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. वसई पूर्व येथे खासगी - सार्वजनिक भागीदारी तत्वावर सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पात पंतप्रधान आवास योजनेची 75981 घरे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामधील अत्यल्प उत्पन्न गटातील 27 हजार घरे आणि अल्प उत्पन्न गटातील 17 हजार घरे मिळणार आहेत.
पंतप्रधान आवास योजनेच्या वसईतील या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून म्हाडा काम पाहणार आहे. त्यानुसार म्हाडाने कॉन्सेप्च्युअल ऍडव्हायरी सर्विसेस एलएलपी कंपनीच्या वसईतील सुरक्षा सिटी प्रकल्पाला संमती दिली आहे.