मोठी बातमी! महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून..., रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar Exclusive Interview : झी 24 तासच्या  'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय. महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून त्यांनी...

नेहा चौधरी | Updated: Oct 5, 2024, 11:41 AM IST
मोठी बातमी! महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून..., रोहित पवारांचा खळबळजनक दावा title=
to the point zee 24 taas

Rohit Pawar on Chief Minister Eknath Shinde : आगामी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून काँग्रेस नेते राहुल गांधीही महाराष्ट्राच्या दौरावर आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात नवं नवीन गौप्यस्फोट होत आहेत. नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष आणि विरोधक कोणते मुद्दे घेऊन मतदारांना आकर्षित करतात हे पाहवं लागणार आहे. 

पण एक मुद्दा प्रामुख्याने गाजण्याची शक्यता आहे. महायुतीत गेल्या काही वर्षांमध्ये एकनाथ शिंदे यांची वाढली ताकद हे भाजपला आवडत नसल्याचा खळबळजनक दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. टू द पॉईंट मुलाखतीमध्ये रोहित पवारांनी हा मोठा दावा केलाय. त्याचसोबत शरद पवारांची ताकद कमी करण्यासाठी कुटुंब फोडलं असा मोठा आरोपही रोहित पवारांनी केलाय. मात्र लोकं ही शरद पवारांची ताकद आहेत असा इशारा रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय.

तिसरी आघाडी म्हणजे भाजपने पुढे केलेली टीम तर नाही ना अशी शंकाही आमदार रोहित पवारांनी या मुलाखतीत उपस्थित केलीय. मतविभाजन करण्यासाठीच तिसरी आघाडी उघडल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय. महायुती आणि महाविकास आघाडीला सक्षम पर्याय म्हणून संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे. याच तिसऱ्या आघाडीवर रोहित पवारांनी आपली शंका बोलून दाखवली आहे.

शरद पवारांकडून कौतुक झाल्यानं नवी ऊर्जा मिळाल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवार बोलत होते. रोहित पवारांना येत्या दोन महिन्यात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यामुळं रोहित पवारांना कोणती मोठी राजकीय जबाबदारी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. टू द पॉईंट या मुलाखतीत रोहित पवारांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिलीय.

शरद पवारांचा यंदा 85 वा वाढदिवस असून 85 जागा निवडून याव्यात ही कार्यकर्त्यांची भावनिक इच्छा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. येत्या 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस आहे. तेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा रोहित पवारांनी टू द पॉईंट जाहीरपणे बोलून दाखवलीय. यंदा तुतारी जबरदस्त वाजणार असा विश्वासही रोहित पवारांनी बोलून दाखवलाय.