Bank Job: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती, पदवीधरांनी 'या' पत्त्यावर पाठवा अर्ज

Bank Of Maharashtra Job: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी निर्माण झाली असून पदवीधर उमेदवारांना येथे नोकरी करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Sep 5, 2023, 05:05 PM IST
Bank Job: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती, पदवीधरांनी 'या' पत्त्यावर पाठवा अर्ज  title=

BOM recruitment 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी निर्माण झाली असून पदवीधर उमेदवारांना येथे नोकरी करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.

'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये 'मुख्य अनुपालन अधिकारी' (Chief Compliance Officer) चे 1 पद भरले जाणार आहे. पुण्याच्या शाखेत ही भरती केली जाणार आहे. चीफ कम्प्लायन्स ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. पीएच.डी./एमबीए/एलएलएम/सीए/सीएमए/सीएस/सीएफए किंवा डिप्लोमा/डिग्री इन कम्प्लायन्स अँड एथिक्स किंवा या समकक्ष यांसारखी अतिरिक्त पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 
उमेदवारांनी आपले अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, 1501, शिवाजीनगर, पुणे 4114005 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 16 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्या.

मध्य रेल्वेत 2400 पदांवर दहावी उत्तीर्णांना संधी, लेखी परीक्षा नाही; 'ही' घ्या अर्जाची लिंक

SBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कामाचा 15 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. 29 ऑगस्ट 2023 रोजी 40 वर्षे ते 45 वर्षपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना अर्जासोबत 750 रुपये शुल्क भरावे लागले. 

GOVT Job: पदवीधरांनो, कॉम्प्युटर ऑपरेटिंग येतं? मुंबईत मिळेल 1 लाख पगाराची नोकरी

एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. सिनीअर वाइस प्रेसिडंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 85 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे. एसबीआयच्या  वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी होणारी मुलाखत 100 गुणांची असेल. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

किमान पात्रता गुण मिळवलेल्या एकापेक्षा जास्त उमेदवारांची कट-ऑफ गुणांची यादी  त्यांच्या वयानुसार उतरत्या क्रमाने तयार केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून 7 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.