रायगड : दापोली येथून महाबळेश्वरला निघालेल्या मिनीबसला आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. या भयंकर दुर्घटनेत बसमधील ३४ प्रवाशांपैकी ३३ जणांचा जागीच मृत्यू झालाय. केवळ एका प्रवाशाला वाचवण्यात यश आल्याचं समजतंय. आत्तापर्यंत आठ-दहा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालंय.
माहिती व मदतीसाठी संपर्क क्रमांक :-
१) चंद्रसेन पवार - महाड तहसीलदार- 8454997740
२) प्रदीप कुडाळ- 9422032244
३) प्रदीप लोकरे- नायब तहसीलदार रोहा- 9423090301
४) श्री.भाबड- नायब तहसीलदार माणगाव -9422382081
चालकाचं नियंत्रण सुटून बस २५० ते ३०० फूट दरीत कोसळली. पोलादपूर पासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभळी टोक गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे.
पोलीस यंत्रणा , तसेच महाबळेश्वर आणि रायगडमधून ट्रेकर्स मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. पुण्यातून एनडीआरएफचं एक पथक तातडीनं घटनास्थळाकडे रवाना करण्यात आलंय.
घाटात दाट धुके असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. या बसमध्ये एकूण ३४ प्रवासी होते... हे सर्व जण कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते.
आंबेनळी घाट हा अतिशय धोकादायक आहे वेडीवाकडी वळणे असल्याने अनेकदा या भागात अपघात होत असतात.
अधिक माहिती - आंबेनळी घाट अपघात : मृतांची नावं
अधिक माहिती - आंबेनळीच्या भीषण अपघातातून वाचलेला हाच तो 'एकमेव' प्रवासी
- पोलादपूरपासून ते महाबळेश्वर असा हा अवघड वळणांचा दीडशे वर्षांचा इतिहास असलेला हा घाट आहे
- कोकण आणि पश्चिम घाटाला जोडणारा जवळपास २० किलोमीटरचा हा घाट आहे
- महाबळेश्वर हे हिलस्टेशन म्हणून विकसीत केल्यानंतर तळकोकण व मुंबई बेट येथून या ठिकाणी विश्रांतीकरता येण्यासाठी आंबेनळी घाटमार्गाची बांधणी करण्यात आली होती
- या घाटाचे बांधकाम १८७१ रोजी सुरू करण्यात आले व १८७६ साली ते पूर्ण झाले
- सध्या या घाटावर बऱ्याच ठिकाणी संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत दिसतात
- पाचशे ते आठशे फूट खोल दरी
- घाटातल्या चिरेखंडीपासून प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडा गावापर्यंत या रस्त्याच्या दोन किमी अंतरात सातत्याने अपघात होतात
- इथल्या दाभोळी टोक या अवघड वळणावरून गाड्या खोल दरीत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत
- याच ठिकाणाहून याआधीही कार कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता