Central Railway Update: प्रवाशांची मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी 40 उन्हाळी स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत चाकरमानी मोठ्या प्रमाणात गावाला जातात. त्यामुळं रेल्वेत कधी कधी पाय ठेवायलाही जागा नसते. तसंच, आरक्षण देखील लगेच फुल होतात त्यामुळं बुकिंग मिळत नाही. ही समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल ते नांदेड दरम्यान 40 उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या सुट्टीत नागरिकांना पनवेल ते नांदेड दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ट्रेन क्रमांक 07626 द्वि साप्ताहिक विशेष ट्रेन 23 एप्रिल ते 27 जूनपर्यंत प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी 2.30 वाजता पनवेलहून रवाना होणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वाजता नांदेडला पोहोचणार आहे.
ट्रेन क्रमांक 07625 द्वि साप्ताहिक विशेष ट्रेन 22 एप्रिल ते 26 जूनपर्यंत प्रत्येक सोमवारी आणि बुधवारी नांदेडवरुन रवाना होणार आहे तर दुपारी 1.25 मिनिटांनी पनवेलला पोहोचणार आहे. ही ट्रेन कल्याण, इगतपूरी, मनमाड, नगरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतुर, सेलू, मनावत, परभणी आणि पूर्णा येथे थांबे असणार आहेत. या ट्रेनचे आरक्षण ऑनलाइन व आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सुरू झाले आहेत. या समर स्पेशल ट्रेनसाठी विशेष शुल्क घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या उन्हाळी स्पेशल ट्रेनचा लाभ घेण्याचे अवाहन केले आहे.
मध्य रेल्वेने मुंबईतूनही उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 01137 साप्ताहिक विशेष गाडी 21 एप्रिल ते 19 मेपर्यंत दर रविवारी 2.30 वाजता सीएसएमटीहून सुटणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता बनारसला पोहोचणार आहे. तर, 01138 साप्ताहिक विशेष गाडी 22 एप्रिल ते 20 मेपर्यंत दर सोमवारी 10 वाजता बनारसहून सुटणार आहे तर सीएसएमटीला मुंबईला तिसऱ्या दिवशी 4.10 वाजता पोहोचणार आहे.
दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, मणिकपूर, प्रयागराज आणि वाराणसी असे थांबे असणार आहेत.