मुंबई : Rajya Sabha elections : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे मंगळवारी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आमदारांशी संवाद साधणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आमदारांची विशेष बैठक आयोजित करण्यात आलीय.
या बैठकीला काही अपक्षही आमदाराही उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. भाजपने तीन उमेदवार दिल्यामुळे सहाव्या जागेसाठी चूरस निर्माण आहे. त्यामुळे शिवसेनेने आता आपलं सर्वस्व पणाला लावले आहे. यामुळे मुख्यमंत्री मतदानाआधी सर्व आमदारांशी स्वतः संवाद साधणार आहेत. आमदार फुटू नयेत यासाठी सर्व आमदारांना 10 तारखेपर्यंत एकत्र ठेवलं जाणार आहे.
दरम्यान, शिवेसना नेते संजय राऊत यांनी आम्हीच तीनही जागा जिंकणार असा दावा केला आहे. तर भाजपकडून सांगण्यात आले आहे की, निवडणुकीनंतर समजेल. आम्ही निवडणूक रिंगणात आहोत. याचा अर्थ आम्ही ही निवडणूक जिंकणार असे म्हटले आहे.
महाविकासा आघाडीकडून राजसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत तोडगा काही निघाला नाही. तसेच भाजप आपला उमेदवार देणार, असे जाहीर केले. त्यामुळे भाजप निवडणुकीवर ठाम असल्याने आता निवडणुकीत चूरस निर्माण झाली आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांच्या मते आपल्याकडे खेचण्यासाठी आता चढाओढ दिसून येत आहे.